शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

जुनाट वजनकाट्यांचा सर्रास वापर

By admin | Updated: November 11, 2014 22:36 IST

आठवडी बाजार, गुजरीमध्ये भाजीपाला विकत घेतानी तर व्यापाऱ्याकडे धान्य विकतानी जुनाट वजनकाट्यांचा वापर करुन ग्राहक आणि शेतकऱ्याची सर्रास लुट केल्या जात असल्याचा आरोप आहे.

कऱ्हांडला : आठवडी बाजार, गुजरीमध्ये भाजीपाला विकत घेतानी तर व्यापाऱ्याकडे धान्य विकतानी जुनाट वजनकाट्यांचा वापर करुन ग्राहक आणि शेतकऱ्याची सर्रास लुट केल्या जात असल्याचा आरोप आहे. प्रमाणित न केलेले जुनाट काटे आणि वजनाचा वापर करुन फसवणूक करण्याचा प्रकार थांबेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात, गुजरीमध्ये वापरत असलेले वजन जुनाट झालेले तसेच दगडाचा वापर वजन म्हणून करित असल्याने वस्तु घेताना ग्राहकांची निराशा होते. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. किलोभर घेतला जाणारा भाजीपाला पावभर घेऊन दैनदिन गरज पूर्ण केली जाते. ग्राहक योग्य मोबदला देऊन माल विकत घेतो. तेव्हा योग्य वजन मिळणे हा त्याचा हक्क आहे. डोकेसरांडी अथवा लाखांदूरचा आठवडी बाजार असो बहूतेक भाजीपाला आणि धान्य विकणारे तेच विक्रेते असतात बऱ्याच माल विक्रेत्याकडे नूतनीकरण केलेले वजन आणि काटा दिसत नाही. काहीची वजनाची परडी जंगलेली फुटलेली असल्याने वजनामध्ये तफावत असते. वजन मांडायच्या परडीत वजन कमी, माल माडायचा परडीचा वजन जास्त असतो. प्रत्येकांच्या काट्याला पासोग असतोच असे ग्राहकांचे म्हणणे आहे. पावभर माल देण्यासाठी बहुतेकांकडे ५० ग्रामचा वजन नसतो. त्याहीपेक्षा कमी माल घेण्याची वेळ आली तर २० ग्रॅम, २५ ग्रॅम वजन दिसतच नाही. अंदाजे तेवढ्या वजनाचा झुकता माल दिला म्हणून ग्राहकांचे समाधान केले जाते. माल मांडावयाच्या परडीच्या बाजूने वजनाचा काटा वाकलेला असतो तर काही वजनाचा काटा तुटलेला अशा संशयास्पद स्थितीमध्ये वजन काटा वापरला जातो. एखाद्या ग्राहकाने माल विक्रेत्याला वजनमापाच्या संदर्भात विचारणा केली तर ग्राहकालाच खोटे ठरविण्याचा प्रकार बघावयास मिळते.हातात वजनकाटा धरुण माल जोराने परडीवर आदळून माडणे, झटका मारुन वजन करणे, हाताच्या तळभागाने दांडीला पुस करणे, तळहात दांडीला लावून ठेवणे, जादूच्या खेळाप्रमाणे हातसफाईने वजन केला जातो. मटणमच्छी बाजारातही वजन काट्याची तीच स्थिती आहे. या सर्व प्रकाराकडे विभाग संबंधित दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्याचे धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचे देखील वजन काटा संशयास्पद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नूतनीकरण केलेले वजनमाप लपवून ठेवून प्रमाणित न केलेल्या वजनमापाचा सर्रास वापर केला जात आहे. आठवडी बाजारामध्ये इलेक्ट्रानिक वजनकाटा वापरावर शक्ती करुन हातामध्ये तराजू धरण्यावर ब्ांदी घालावी. व्यापाऱ्यांनाही इलेक्ट्रानिक वजनकाटाचा वापराची शक्ती करुन ग्राहकांची सर्रास होणारी लूट थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)