शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 15:55 IST

भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्षांनी आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते भंडाऱ्यात भाजप आयोजित मोर्चाला संबोधित करत होते. 

भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी भंडऱ्यातील दुर्घटना हा अपघात असून सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणातून झालेला खून आहे, असं म्हटलं आहे. 

वाढीव वीजबिल माफीवरुन घुमजाव करणारं सरकार"राज्यातील सामान्य जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफीची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं थेट घुमजाव केलं. अशाप्रकारचा ढोंगबाजी करणारं सरकार आजवर पाहिलेलं नाही. ठाकरे सरकार हे बेईमान सरकार आहे. या सरकारविरोधात लढा अशाच पद्धतीने यापुढील काळतही सुरूच राहील. दिलेला शब्द न पाळलेल्या ऊर्जामंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही", असं फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेच्या घरी कुणी वीज कनेक्शन कापण्यासाठी कुणी अधिकारी आलाच तर त्याला गुलाब देऊन त्याच्याच गाडीत बसवून घरी पाठवून द्या, असा सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिला. 

सरकारची योजना फक्त माल कमविणेमहाविकास आघाडी सरकारला राज्यातील सामन्य जनतेची काहीच पडलेली नाही. केवळ बिल्डरांसाठी हे सरकार काम करत असल्याचाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. "केवळ माल कमवणे हीच या सरकारची सर्वात मोठी योजना आहे. धान खरेदीतही मोठा घोटाळा झाला आहे", असं फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhandara Fireभंडारा आगBJPभाजपाFarmerशेतकरीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च