शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या हमीभावात केली तुटपुंजी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने २०२१-२२ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात ७२ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण ...

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने २०२१-२२ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात ७२ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण धानाला येत्या खरीप हंगामात १९४० रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. धानाच्या लागवड खर्चात प्रचंड वाढ झाली असताना त्या तुलनेत केलेली वाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.

पूर्व विदर्भात धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. इंधनाशिवाय शेती होत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मजुरी, रासायनिक खत, औषधांच्या किमती वाढल्या आहेत. नैसर्गिक संकट तर पाचवीलाच पुजले आहे. या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अंगमेहनतीशिवाय शेती व्यवसाय चालतच नाही. साधारणतः १२० दिवसांचा हंगाम असतो. शेतात अख्खे कुटुंब राबते, यात अतिशयोक्ती नाही. सर्वांच्या मजुरीचा विचार केला तर शेती व्यवसाय हा परवडणारा नाही. मागील वर्षांचा विचार करता शेतीचा लागवड खर्च हा तब्बल २५ टक्क्यांनी वाढला आहे. २०१९-२० या वर्षात जिथे २६,५५० रुपये खर्च होता. तो २०२०-२१ मध्ये ३१,५३० रुपये झाला आहे. वास्तविकतेत ग्रामीण भागात शेती हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे; मात्र या व्यवसायाकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे.

लागवड खर्चाच्या तुलनेत हमीभाव वाढत नसल्याने शेतकरी दुबळा होत चालला आहे. धानाचे आधारभूत हमीभाव केवळ ७२ रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या पाच वर्षांत लागवड खर्च पाचपटीने वाढला आहे. केंद्र शासनाने केलेली ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाने तीन हजार रुपये प्रतिक्विंटल धानाला आधारभूत किंमत दिली तरच शेतकऱ्यांचे भले होईल.

- गंगाधर परशुरामकर, माजी जि. प. सदस्य, गोंदिया