दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:46+5:30

भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कारखाना सुरू करण्यास उशीर झाला, अशा कर्मचाऱ्यांची ना. केदार यांनी कानउघाडणी केली.

Milk processing factory to be started | दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार

दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार

Next
ठळक मुद्देसुनील केदार : जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा हा दूध उत्पादक जिल्हा आहे. मात्र जिल्हा दूध उत्पादक संघाचा दूध प्रक्रिया प्रकल्प प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाअभावी बंद आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. आता हा कारखाना लवकरच सुरू होणार असून असे निर्देश दुग्ध व पशुसंवर्धन मंंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कारखाना सुरू करण्यास उशीर झाला, अशा कर्मचाऱ्यांची ना. केदार यांनी कानउघाडणी केली. कारखाना बंद असल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याची जाणीव त्यांना करून दिली. हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याचे सक्तीचे निर्देश सुनील केदार यांनी दिले. हा दूर प्रक्रिया कारखाना सुरू झाल्यास जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा दूध संघाचे संचालक विनायक बुरडे, रामलाल चौधरी, माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, शिवा गायधने उपस्थित होते.

दोन कोटींचा निधी
भंडारा येथील वरठी रस्त्यावर दूध प्रक्रिया कारखाना उभारण्यात आला होता. परंतु तो अद्यापही सुरू झाला नाही. आता या कारखान्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांनी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कारखाना लवकरच सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाला आहे.

Web Title: Milk processing factory to be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.