शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळींचे आक्रमण; धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 21, 2016 00:24 IST

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे.

मंडळ कृषी अधिकाऱ्यांची शिवारफेरी : अळीच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन, निंबोळी अर्काचे वाटपमुखरु बागडे पालांदूरपावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे. यामुळे धानपिक संकटात सापडले आहे. शेतकरी घाबरला असून त्यांच्या मदतीकरिता मंडळ कृषी कार्यालयाची चमू थेट बांधावर फेरी घालत अळींच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन करीत आहे.ग्रामपंचायत व बैठकीच्या ठिकाणी चर्चासत्राचे नियोजन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता अळींच्या नियंत्रणाचे आवाहन प्रभारी मंडळ कृषी अधिकारी अनिल शहारे यांनी केले आहे.१५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता असून तापमानात वाढ झाली आहे. यामुळे हवामानात बदल येऊन लष्करी अळी, खोडकिडी, गादमाशीला पोषक वातावरण तयार झाल्याने अळींचे वाढतच चालले आहे. ज्या भागात रोवणी उशिरा झाली. पाऊस कमी पडता किंवा बांध्यात पाणी नसल्या ठिकाणी अळीने आक्रमण करुन धानपिक नष्ट केले आहे. शिवारफेरीत नुकसानग्रस्त शेतकरी जगदीश हटवार यांच्या शेतात लष्करी अळीचे जोरदार आक्रमण आढळले. पाणी नसल्याने समस्या आणखी वाढली. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, कृषी सहायक श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, परसराम भुते, नंदनवार यांनी अभ्यास केला. अळी नियंत्रणाकरिता डायक्लोरोव्हास ७६ ईसी १० लीटर पाण्यात १२.५ मि.मी. किंवा क्लोरोफारॉफॉस यांचे मिश्रण २५ एमएल १० लीटर पाण्यात म्हणजे १५ लिटर पाण्यात ३५ मिली औषधाची मात्रा स्वच्छ पाण्यातून फवारणी करावी. बांध्या स्वच्छ ठेवावे, पिकांवर नियंत्रित लक्ष ठेवून मंडळ कृषी कार्यालयाला भेट देत समस्यांशी निगडीत चर्चा करण्याचे आवाहन केले महागाईचा सामना करताना शेतकरी कमी पडत आहे. कृषी केंद्रातून किटकनाशक खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते. नेमक्या औषधींने किड नियंत्रणात येताना दिसत नाही. एका सोबत २ ते ३ औषधांचे मिश्रण फवारावे लागते. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानावर मोफत किटकनाशक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्वरीत करावी.- जगदीश हटवार, नुकसानग्रस्त शेतकरी, पालांदूर.