शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेचे लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: February 10, 2016 00:42 IST

जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले.

आमरण उपोषण इशारा : वरिष्ठांना निवेदनभंडारा : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, आ. चरण वाघमारे, शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी भोंगाडे व परिषद पदाधिकारी यांच्याशी आलेल्या चर्चेत १५ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करून मागण्या निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास १६ पासून आमरण उपोषणाचा इशाराही परिषदेतर्फे देण्यात आला आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे नागपूरला आले होते. ३ वा. त्यांची सुद्धा भेट घेण्यात आली. चर्चेदरम्यान त्यांनी नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक पारधी यांना निर्देश देत आमरण उपोषणाची पाळी येवू देऊ नका समस्या तात्काळ निकाली काढा असे स्पष्ट निर्देश दिले. शिक्षकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून शिक्षण विभागातर्फे संघटनेसोबत दोन महिन्यातून एकदा सहविचार सभा आयोजित केली जाते. मात्र शिक्षण विभाग केवळ या चर्चेला देखावा करते आणि सहजसोप्या समस्यांना किचकट करून कित्येक महिने समस्या निकाली काढत नाही. या प्रलंबित मागण्या घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर सकाळी १०.३० पासून जिल्हाध्यक्ष आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. यात परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ.उल्हास फडके, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे, अशोक वैद्य, के.के. बाजपेयी, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, राजेश निंबार्ते, राधेश्याम धोटे, राजेश बारई, हरिभाऊ पडोळे, संजय शिवनकर, पांडूरंग टेंभरे, महादेव साटोें, विजय करंडे, सशांक चोपकर, डी.आर. बोडखे, दिलीप वाणी, कांचन गहाणे, प्रदीप गोमासे, यादव गायकवाड, दिशा गद्रे, मनीषा काशिवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मागण्यांमध्ये अनुकंपा तत्वावर सुहास चरणदास कान्हेकर यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे, एन.आर. भोवते, प्रकाश विद्या. कारधा यांना सेवासंरक्षण व इतर लाभ, मनोहर हरडे सेवानिवृत्त गं्रथपाल यांना पेन्शनचे लाभ, एल.डी. फटे यांना सेवानिवृत्त वेतनलाभ, देवी सरस्वती विद्यालय, शिंगोरी या शाळेत जुन्या शिक्षकांचे समायोजन करणे, प्रदीप गोमासे, परशुरामकर यांना मुख्याध्यापक पदाची मान्यता, के.के. बाजपेयी यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने सेवानिवृत्तीचे लाभ इत्या. मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)