शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

मेजर प्रफुल्ल यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:12 PM

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीरमरण आले.

ठळक मुद्देपवनीत श्रद्धांजली सभेत संकल्प : स्मारकासाठी अवसरेंची २१ लाख रूपयांची घोषणा

आॅनलाईन लोकमतपवनी : काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीरमरण आले. शहीद वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी पवनी नगरपालिका व नगर विकास आघाडीने सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन केले. पवनी तालुक्यातील युवकांचे श्रद्धास्थान व्हावे असे प्रेरणादायी स्मारक नगरात उभारण्यात यावे, असा संकल्प आयोजित श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करताना केला.महात्मा गांधी चौकात आयोजित श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी, भाजपाचे शहर अध्यक्ष हरिश तलमले, जि.प.चे माजी सभापती विकास राऊत, माजी नगराध्यक्षा रजनी मोटघरे, जि.प.च्या माजी सभापती हंसा खोब्रागडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अनिल धकाते, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, व्यापारी संघाचे प्रकाश नखाते, औषधी विक्रेता संघाचे सतीश लेपसे, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज रामटेके, पत्रकार धनंजय जटाल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी माजी न.प. उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, माजी पं.स. सदस्य शैलेश मयूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर, पं.स. सदस्य मनोहर आकरे, युवाशक्ती संघनेचे देवराज बावनकर, नगर परिषदेचे सभापती व सर्व नगरसेवक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.पवनी नगर पालिकेने मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प केल्यामुळे मोहरकर कुटुंबियांनी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे अस्थिकलश सुपूर्द केला. अस्थिकलश दर्शनासाठी सभास्थळी ठेवण्यात आला होता. अस्थिकलशाचे पावित्र्य जोपासले गेले पाहिजे व स्मारक उभारण्यावरून राजकारण करण्यात येऊ नये असे हमीपत्र पालिकेकडून लेखी स्वरूपात घेऊन मोहरकर कुटुंबियांनी अस्थिकलश पालिकेच्या सुपूर्द केला. स्मारकाच्या उभारणीसाठी स्थानिक विकास निधीमधून २१ लाख रूपयांचा निधी देण्याचे आणि पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यामार्फत अधिकच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना घोषित केले.शहीद मेजर प्रफुल्ल यांच्या देशसेवेपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे मनोगत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी शहीद मेजर प्रफुल्लच्या स्मारणात उभारण्यात येणारे स्मारक युवकांसाठी प्रेरणादायी ठरावे अशा स्वरूपाचे असेल असे सांगून स्मारक उभारणीसाठी नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवावी असे मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन अ‍ॅड.व्ही.सी. खोब्रागडे यांनी केले. सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.