शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्माची सांगड घालून मानवसेवा करा

By admin | Updated: September 6, 2016 00:27 IST

आध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून मानवसेवा व दानाची निर्मिती करणे हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचेकडून बोध घेण्यासारखे आहे.

रामचंद्र अवसरे : महारक्तदान शिबिरात ११२ बॉटल्स रक्त गोळाभंडारा : आध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून मानवसेवा व दानाची निर्मिती करणे हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचेकडून बोध घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनास ५० हजार व देशाच्या संरक्षण विभागास ५० हजार बॉटल रक्तदानाचे संकल्प अभियान सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी सामान्य रुग्णालय भंडारा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले शासकीय अंध विद्यालय भंडारा शिक्षक आदेश बनकर व अपंग दिनेश बनकर यांनी पहिले रक्तदान करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, डॉ.सुनिता लक्ष्मण बडे, डॉ.फेगडकर, डॉ.मदन काटे, दिपक साठवणे, नरेंद्र बुरडे उपस्थित होते. डॉ. धकाते यांनी, रक्तदान, अवयवदान व देहदान करून मानवसेवा करा असे आवाहन केले. जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या वतीने ६५,९०० लोकांनी देहदान संकल्प केल्याबद्दल संप्रदायाची व भक्तांची प्रशंसा केली. शिबिरात ११२ बॉटल रक्त गोळा करण्यात आले. भैय्यालाल लिमजे यांनी देहदान संकल्प केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. आमदार अवसरे यांच्या हस्ते लिमजे दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विभाग प्रमुख विनिता चकोले, वत्सला मानमोठे, रत्ना मोगरे, सोनाली लांबट यांनी सहकार्य केले. याप्रसंगी व्यासपीठावर अनिल साठे, कांता बिल्लोरे, श्रीधर वैद्य, मनोज डोये, नितीन वंजारी, ईश्वर शेबे, होमराज वनवे, प्रशांत कुरंजेकर, राधेश्याम मते उपस्थित होते. संचालन संतोष भुरे यांनी केले. प्रास्ताविक दिपक साठवणे यांनी केले. तर आभार भारत लांजेवार यांनी मानले. रक्तदानाचे कार्य प्रदीप मानापुरे, महेश शहारे, रविंद्र कोहाडे, अशोक पडोळे, महेश गोन्नाडे, शकुंतला गोन्नाडे, राजकुमार साखरकर, दिलीप भोंडे, सुधीर बेदरकर, अनिल कावळे, रवी मोथरकर, उमेश मौजे, सुरेश नान्हे, विजय गिऱ्हेपुंजे, हेमराज गहाने, जयमाला वंजारी, आरती लांजेवार, रेखा भेदे, मोथरकर, सविता घोनमोडे, रंजना भोंडे यांनी पार पाडले. (नगर प्रतिनिधी)