आध्यात्माची सांगड घालून मानवसेवा करा

By Admin | Updated: September 6, 2016 00:27 IST2016-09-06T00:27:50+5:302016-09-06T00:27:50+5:30

आध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून मानवसेवा व दानाची निर्मिती करणे हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचेकडून बोध घेण्यासारखे आहे.

Make a human service with a combination of Spiritualism | आध्यात्माची सांगड घालून मानवसेवा करा

आध्यात्माची सांगड घालून मानवसेवा करा

रामचंद्र अवसरे : महारक्तदान शिबिरात ११२ बॉटल्स रक्त गोळा
भंडारा : आध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून मानवसेवा व दानाची निर्मिती करणे हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचेकडून बोध घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनास ५० हजार व देशाच्या संरक्षण विभागास ५० हजार बॉटल रक्तदानाचे संकल्प अभियान सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी सामान्य रुग्णालय भंडारा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले शासकीय अंध विद्यालय भंडारा शिक्षक आदेश बनकर व अपंग दिनेश बनकर यांनी पहिले रक्तदान करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, डॉ.सुनिता लक्ष्मण बडे, डॉ.फेगडकर, डॉ.मदन काटे, दिपक साठवणे, नरेंद्र बुरडे उपस्थित होते. डॉ. धकाते यांनी, रक्तदान, अवयवदान व देहदान करून मानवसेवा करा असे आवाहन केले. जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या वतीने ६५,९०० लोकांनी देहदान संकल्प केल्याबद्दल संप्रदायाची व भक्तांची प्रशंसा केली. शिबिरात ११२ बॉटल रक्त गोळा करण्यात आले. भैय्यालाल लिमजे यांनी देहदान संकल्प केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. आमदार अवसरे यांच्या हस्ते लिमजे दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विभाग प्रमुख विनिता चकोले, वत्सला मानमोठे, रत्ना मोगरे, सोनाली लांबट यांनी सहकार्य केले. याप्रसंगी व्यासपीठावर अनिल साठे, कांता बिल्लोरे, श्रीधर वैद्य, मनोज डोये, नितीन वंजारी, ईश्वर शेबे, होमराज वनवे, प्रशांत कुरंजेकर, राधेश्याम मते उपस्थित होते. संचालन संतोष भुरे यांनी केले.
प्रास्ताविक दिपक साठवणे यांनी केले. तर आभार भारत लांजेवार यांनी मानले. रक्तदानाचे कार्य प्रदीप मानापुरे, महेश शहारे, रविंद्र कोहाडे, अशोक पडोळे, महेश गोन्नाडे, शकुंतला गोन्नाडे, राजकुमार साखरकर, दिलीप भोंडे, सुधीर बेदरकर, अनिल कावळे, रवी मोथरकर, उमेश मौजे, सुरेश नान्हे, विजय गिऱ्हेपुंजे, हेमराज गहाने, जयमाला वंजारी, आरती लांजेवार, रेखा भेदे, मोथरकर, सविता घोनमोडे, रंजना भोंडे यांनी पार पाडले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Make a human service with a combination of Spiritualism