शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी २४०० अधिकारी, कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM

त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १४ व १५ ऑक्टोबर रोजी चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक मुद्देदोन दिवसीय प्रशिक्षण : निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून भंडारा विधानसभा क्षेत्रातील २४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील हेमंत सेलीब्रेशनमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि तहसीलदार अक्षय पोयाम उपस्थित होते.राज्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १४ व १५ ऑक्टोबर रोजी चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बुथनिहाय केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी असे चार जण याप्रमाणे भंडारा क्षेत्रातील ४५६ बुथवर २१२४ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले. पहिल्या दिवशी या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत क्षेत्रीय अधिकारी तसेच दुसऱ्या सत्रात ४० सुक्ष्म निरीक्षक यांचा सहभाग होता. यावेळी निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शंकांचे समाधान केले.भंडारा मतदारसंघात मतदान व मतमोजणीचे प्रशिक्षणदोन दिवसीय प्रशिक्षणात मतदान व मतमोजणी प्रक्रिया जबाबदारीने कशी पार पाडावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात ईव्हीएम हाताळणे, मतदान प्रक्रियेतील जबाबदारी, अभिरुप मतदान प्रमाणपत्र, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतदान केंद्राध्यक्षांनी करावयाचे घोषणापत्र, नोंदविलेल्या मतांचा हिशेब, मतदानाची टक्केवारी यासोबतच मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन आदी प्रपत्रासोबतच निवडणूक विषयक माहिती देण्यात आली.निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षण स्थळी टपाल मतदान सुविधा कक्ष उघडण्यात आला होता. निवडणूक अधिकारी तथा नोडल बॅलेटचे पोस्टल अधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. एबीसी लिफापे, डिक्लेरेशन फॉर्म, सूचना पत्र, टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा