शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेस, राकाँकडे वाणवा

By admin | Updated: October 19, 2014 23:16 IST

एकेकाळी कॉग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे

भंडारा : एकेकाळी कॉग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश आले नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांची ही उदासीनता बऱ्याच अंशी विधानसभेतही कारणीभूत ठरली. भाजप लाटेचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहिल्याचे जाणवले.दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत सहापैकी चार आमदार भाजप-सेनेचे होते. आजच्या निकालानंतर शिवसेनेची माघार झाली. ग्रामीण भागावर भाजपाची पकड दिसली. भंडारा जिल्हयातील तिन्ही विधानसभा जागांवर भाजपने कब्जा केला. कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जो साध्य करता आले नाही, ते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून दाखविले. मतांचे विभाजन आणि नावाची लाट या दोन प्रमुख कारणांमुळे भाजपने दणदणीत यश संपादन केले. भाजपने प्रत्येक फळीतला कार्यकर्ता शेवटपर्यंत जपून ठेवला असेच म्हणावे लागेल. ही किमया कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षात करता आली नाही. खरा कार्यकर्ता कुठेतरी दुखावला, कुठेतरी हरवला असे दृश्य होते. मेहनत घेणाऱ्या कार्यकर्ते असले तरी या कार्यकर्त्यांच्या संख्या मात्र रोडावली. याचाच फटका या निवडणुकीत बसला. वरिष्ठ नेत्यांी पकड कुठेतरी सैल झाली, असे वाटले. व्यक्तिमत्वामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव दिसून येणाऱ्यांची छाप यंदा दिसलीच नाही. नाव हवेत विरले आणि लाटेत राहणाऱ्या नावामुळे उमेदवार निवडून आले. साधारण सदस्य ते बुथ कमिटीपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाणवा होता. कार्यकर्त्यांवर पकड ठेवण्यात जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी कमी पडल्याचे दिसून आले. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते आपापल्या भागात वर्चस्व ठेवून आहेत. परंतू काही क्षेत्र वगळता कुठेही राष्ट्रवादीची पकड दिसून आली नाही. त्यामुळेच या मतदार संघात भाजपला चांगली मते मिळाली. (प्रतिनिधी)