शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगूल अर्ज घेऊन आले, विवाहबंधनात अडकले

By admin | Updated: November 12, 2014 22:38 IST

प्रेमात पडलेल्या प्रेमविराचे जग निराळेच असते. त्यांनी लग्न करतो म्हटले की अनेक समस्या येतात. जात, धर्म व नातलगाचा विरोध अशा भानगडीत अनेक प्रेमविवाह होतात.

वरठी : प्रेमात पडलेल्या प्रेमविराचे जग निराळेच असते. त्यांनी लग्न करतो म्हटले की अनेक समस्या येतात. जात, धर्म व नातलगाचा विरोध अशा भानगडीत अनेक प्रेमविवाह होतात. त्यांच्या या सोहळ्यास आप्तस्वकीयांसह वऱ्हाडी कमी असतात. पण मोहाडी तालुक्यातील पाहुणी या गावातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख देत एका प्रेमी युगुलाचे लग्न अर्धा तासाच्या तयारीत धुमधडाक्यात लावून दिले. भंडारा येथील रहिवासी असलेले कपील बनसोडे याचे एका महाविद्यालयीन युवतीशी प्रेमसुत जुळले. दोघांचेही शिक्षण सुरु होते. तीन वर्षाच्या प्रेमसंबंधात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण घरून विरोध. अशात कपीलने एका नातेवाईकाची मदत घेतली. मित्राच्या मदतीने कपील व हर्षलताचे लग्न महात्मा गांधी तंटामुक्त समिती पाहुणीच्या माध्यमातून लावून देण्याचे ठरविले.लग्न लावण्याचे ठरले. पण त्यासाठी तयारी नव्हती. त्यातल्या त्यात घरच्यांचा विरोध होता. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण मिरासे, पोलीस पाटील चव्हाण, सरपंच छोटुलाल मिरासे यांनी प्रेमी युगुलाची कसून विचारपूस केली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. लग्नाचे अर्ज घेवून आलेले युगुल घर सोडून आले होते. कोणत्याही प्रकारचे साहित्य त्यांच्याजवळ नव्हते. अशात सरपंच छोटुलाल मिरासे यांनी गावातून पुजेची हळद आणली. माजी सरपंच भगवान धुर्वे यांनी घरून नवरदेवाची टोली दिली. प्रतिष्ठत नागरिक रामू बदने यांनी अक्षदा बोलाविल्या. गावातून काही युवकांनी दिवाळीनिमित्त ठेवलेले फटाके आणले. सार्वजनिक मंदिरातील भोंग्याचा आधार घेतला व पाहता पाहता शेकडो महिला पुरुष प्रेमी युगुलांना आशीर्वाद देण्यास जमा झाले. एका इसमाच्या मोबाईलवर मंगलाष्टक वाजवून लग्नाचा बार उडवून लावला.सरपंच छोटुलाल मिरासे, तंमुस अध्यक्ष बाळकृष्ण मिरासे, माजी सरपंच भगवान धुर्वे, पोलीस पाटील प्रितम चव्हाण, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पुडके, रामू बदने, संजय पटले, सीताराम गोमासे, देवीलाल मिरासे यांच्या पुढाकाराने या प्रेमी युगलाचे लग्न लावून दिले. हा लग्न सोहळा येथे न थांबता गावातील अनेकांनी या जोडप्यास भेट म्हणून पैसे दिले. एकंदरीत तंमुसच्या माध्यमातून आजतागायत झालेल्या लग्न सोहळ्यापैकी हा सोहळा वेगळा होता. (वार्ताहर)