परिक्षा शुल्क अपहार प्रकरणी लिपीकास अटक

By Admin | Updated: September 24, 2016 01:48 IST2016-09-24T01:48:53+5:302016-09-24T01:48:53+5:30

येथील नर्मदाबाई ठवकर कनिष्ठ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अभ्यास केंद्रातील

Liquidate arrest in case of examination charge abduction case | परिक्षा शुल्क अपहार प्रकरणी लिपीकास अटक

परिक्षा शुल्क अपहार प्रकरणी लिपीकास अटक

मोहाडी : येथील नर्मदाबाई ठवकर कनिष्ठ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अभ्यास केंद्रातील लिपीकाने विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क घेऊन विद्यापिठाकडे जमा न करता पैशाचा अपहार केला होता. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी सतिश डोकरीमारे (३१) रा. मोहगाव याला अटक केली आहे.
ठवकर महाविद्यालयात परिक्षा केंद्र आहे. या संस्थेतील लिपीक शतिष डोकरीमारे याने विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्क घेतले. विद्यापिठाकडे एकाही विद्यार्थ्याची नोंदणी केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापिठाची परिक्षा देवु शकले नाही. त्यांचा एक वर्ष वाया गेला. अनेक विद्यार्थ्यांनी याची तक्रार पोलिसात सुध्दा केली. मात्र पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिला. संस्थाचालक व लिपीकात समन्वय साधुन यावर तोडगा काढण्याची मागणी सुध्दा करण्यात आली होती. शेवटी या संस्थेचे संस्थाचालक सुरेश ठवकर यांनी डोकरीमारे विरुध्द पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन लिपीकास अटक केली. आरोपी डोकरीमारे याने १.५५ लाख रुपयांचा अपहार केलयाचे तक्रारीत नमुद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथुन चांदेवार हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Liquidate arrest in case of examination charge abduction case