शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्स निलंबन कारवाईने वाहनधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर नवीन वर्षात ९६ ...

गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर नवीन वर्षात ९६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलणारे १५७ वाहनधारक तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३५ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. रेड सिग्नल जम्पिंगमध्ये जानेवारी महिन्यात चार तर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसमध्ये जानेवारी महिन्यात ५ तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक नोव्हेंबरमध्ये एक अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

नवीन वर्षात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी फिरते पथक तैनात केले आहे. त्यामुळे नववर्षात अवघ्या दोन महिन्यात ९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलत वाहने चालविणाऱ्या २९ वाहनधारकांवर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६७ वाहनधारकांवर तर सिग्नल तोडणाऱ्या चौघांवर कारवाई झाली आहे. गत वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल सात हजार २३१ वाहनांवर वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनातर्फे कारवाई करण्यात आली होती. या वाहनधारकांना ४७ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केल्याने नागरिकांनीही आता धास्ती घेतली आहे.

बॉक्स

वाहन चालविताना लायसन्स आवश्यक

अनेक पालक आपल्या पाल्यांना दुचाकी घेऊन देतात मात्र १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक जण दुचाकीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरतात. नाईलाजाने पालक पाल्यांना गाडी देतात. मात्र आता वाहतूक पोलिसांकडून लायसन्स विना फिरणाऱ्या दुचाकी धारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच मालवाहू गाडीतून प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास त्यांचा वाहतूक परवानाही रद्द करण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन न केल्यास आढळून आल्यास अशा धारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

कोट

शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे सुरू आहे. भंडारा शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नागरिकांनीही पोलिसांना अपेक्षित सहकार्य करण्याची गरज आहे.

शिवाजी कदम,

पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, भंडारा