शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा बांधू द्या, त्यानंतर फोडा! अधिकाऱ्याचे सुतोवाच

By admin | Updated: February 15, 2015 00:32 IST

साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे.

भंडारा : साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे. येथील शेती बुडीत क्षेत्रात येत असतानाही तिथे लघु पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच पैसे घेऊन गप्प रहा, नाही तर बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यावर त्याला फोडा. असे सुतोवाच केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ बंधाऱ्याबाबत कैफियत मांडली.शासनाने शेतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी सर्वत्र बंधारे बांधकाम करण्यावर भर दिला आहे. याच अनुशंगाने, जिल्ह्यातील शेतींना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी धरण व बंधाऱ्यांचे कामे करण्यात येत आहे. मार्च एंडिंग असल्याने आता प्रत्येक विभागातील शिल्लक निधी परत जाण्याची भीती असल्याने विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी निधीच्या उपयोगातून कामावर खर्च करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचा करार ग्रामपंचायतीच्या नावाने असला तरी हे काम कंत्राटदाराकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. या क्षेत्रातील शेती नाल्याच्या पाण्यामुळे अगोदरच बुडीत क्षेत्रात येते. शेती बुडीत प्रकरणाचे शेतकऱ्यांना पैसेही मिळालेले आहे. असे असताना बांधण्यात येत असलेला बंधाऱ्याचे काम चुकीचे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बांधकामाला विरोध केला. बांधकाम करण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काम करण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला असतानाही जेसीबीच्या माध्यमातून नाल्याचे सपाटीकरण करून पाण्याला थोप बसावी, यासाठी मातीकाम करण्यात आले. याबाबत लघु पाटबंधाारे विभागाचे साकोली उपविभागाचे अभियंता धुर्वे यांनी शेतकऱ्यांना आधी बंधारा बांधू द्या, कंत्राटदाराचे पैसे निघाल्यावर तोडून टाका, असा सल्ला दिल्याचा उदय जगदीश बोरकर या शेतकऱ्याने ‘लोकमत’जवळ सांगितले. या बंधाऱ्यामुळे शासकीय पैशाचा दुरूपयोग होत असून हे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी दयाराम रूरखमोडे, हरिदास रूखमोडे, केवळराम रूखमोडे, उदय बोरकर, हरीभाऊ रूखमोडे, जागेश्वर रूखमोडे आदी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)