शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या पडला विहिरीत

By admin | Updated: February 25, 2015 01:11 IST

तालुक्यातील वलनी - आसगाव शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका इसमावर हल्ला केला. यात इसम किरकोळ जखमी झाला असला तरी ...

आसगाव / पवनी: तालुक्यातील वलनी - आसगाव शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका इसमावर हल्ला केला. यात इसम किरकोळ जखमी झाला असला तरी बिबट्या रस्त्यालगतच्या कठडे नसलेल्या विहिरीत पडला. ही घटना मंगळवारी सकाळी वलनी-आसगाव शेतशिवारात घडली.जंगलव्याप्त तालुका असलेल्या पवनी येथून जवळच असलेल्या वलनी आसगाव शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून हिंस्त्र पशूंनी अनेकांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारला सकाळी वलनी शेतशिवारातील शामराव गभणे यांच्या उसाच्या मळ्यात एक बिबट दबा धरून बसला होता. ही बाब परिसरातील नागरिकांना लक्षात आली. त्याला बघणाऱ्यांची तोबा गर्दी उसळली. दरम्यान तिथून जाणाऱ्या इसमावर बिबट्याने झडप घातली. यात सदर इसम किरकोळ जखमी झाला. मात्र झडप घेतल्यानंतर बिबट्या रस्त्यालगत असलेल्या व कठडे नसलेल्या विहिरीत पडला. यात इसमासह बिबट्याही किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहितीवरून वनाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या खोल पाण्यात बिबट्या पडल्याने तो जखमी झाला. त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाने दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले. वृत्तलिहिपर्यंत विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)बिबट ज्या विहिरीत पडला त्या विहिरीचा व्यास कमी असल्याने बिबट जखमी झाला आहे. अशा स्थितीत त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनकर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. इसम जखमीआसगाव येथील अनिल कोरे हा मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करीत आहे. लोकमतची एजंसी त्यांच्याकडे असल्याने वृत्तपत्राचे वाटप करण्यासाठी आज नित्याप्रमाणे सायकलने वलनीकडे निघाला. ऊसाच्या तांड्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांना पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.