शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उपाशी गावकऱ्यांना मिळाले धान्य

By admin | Updated: May 22, 2017 00:45 IST

धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी.. ही बातमी झळकताच आज मोरगाव येथे गावकऱ्यांना सरकारी

गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य : ‘लोकमत’चे मानले आभार राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी.. ही बातमी झळकताच आज मोरगाव येथे गावकऱ्यांना सरकारी स्वस्त धान्याचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांना धान्य मिळाल्याचे आनंद चेहऱ्यावर दिसून येत होते. ‘लोकमत’ पाठीशी उभा राहल्याने उपाशी असलेल्या गावकऱ्यांना धान्य मिळाले असल्याची गावकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले. मोरगाव येथील गावकऱ्यांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मार्च महिन्यापासून धान्य वाटप झाले नाही. स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेला घोळ कारणीभूत होता. वाटप रजिस्टरमध्ये बऱ्याच शंकास्पद भानगडी निर्माण केल्या गेल्याने मोरगावच्या गरीब व सामान्य परिवारांना मार्च महिन्यापासून धान्यापासून वंचित रहावे लागले होते. मोरगावचे सरकारी स्वस्त धान्य परवानाधारक मनिषा रामटेके यांनी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे बनावट नावे दाखवून धान्याची उचल केली. काहींचे नावे बीपीएलमध्ये असतानी त्यांचे नावे गाळली. अंत्योदय कार्डामध्येही बारा भानगडी करून गावकऱ्यांचे धान्य खुल्या बाजारात विकले जात होते व गावकऱ्यांना धान्यापासून वंचित ठेवले जात होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला. परवानाधारकाविरूद्ध लढा पुकारला. चौकशी लागली. पण, डी. वन कोणता ग्राह्य धरायचा या प्रश्नामुळे भ्रमंती झालेले प्रशासन संकटात सापडले. गावकऱ्यांनी डी वन वर आक्षेप घेतला होता. त्यामुळे धान्य वाटपाची प्रक्रिया बंद पडली होती. तालुका प्रशासनालाही याची फिकीर नव्हती. त्यामुळे मार्च पासूनचे धान्य गरीब लोकांपर्यंत पोहचले नाही. गावकऱ्यांनी समझदारी घेवून धान्य वाटप करा यासंबंधी १६ मे रोजी तहसिलदार यांना पत्र दिले. तरीही प्रशासनाची झोप उघडली नव्हती. अखेर लोकमतने धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी, तीन महिन्याचे धान्य गोदामात पडून हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी धान्य वाटपाचे निर्देश मोहाडी येथील दुकानदाराला दिले. तत्पूर्वी, प्रस्तुत प्रतिनिधी तहसिलदार यांच्याशी गरीब जनतेला धान्य देण्यासंबंधी संवाद साधला होता. त्याचा व बातमीचा परिणाम म्हणून आज सकाळपासून मोरगाव येथे श्री गणेश हातमाग सोसायटी मोहाडीचे संचालक राजू बावणे यांनी धान्याचे वाटप करणे सुरू केले. सकाळी गावकरी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेले होते. त्यामुळे केवळ नऊ लोकांनी धान्य घेतले. दुपारी १.३० नंतर पुन्हा धान्य वाटपाचे काम सुरू झाले. गहू, तांदूळ, साखर यांचे वाटप करणे सुरू होते. बातमी लिहीपर्यंत एकूण ६५ शिधा पत्रिकाधारकांना धान्य, साखरेचे वाटप करण्यात आले होते. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नव्हती यांना धान्य देण्याचे अडविण्यात आले होते पण तहसिलदार नवनाथ कातकेडे यांनी समजूतदारपणा घेवून सर्वच स्तरातील जनतेला धान्य देण्याचे निर्देश दिले. मोरगाव येथील सहदेव हारगुळे यांच्या घरी धान्य वाटपाचे काम सुरू होते. तीन महिन्यानंतर हक्काचा धान्य, साखर शिधापत्रिका धारकांना मिळत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य उमलत होते. लोक समाधान व्यक्त करीत होते. लोकमतने आमच्या लढ्यात योगदान देत असल्याचे गावकरी विसरले नाही. आता यापूढे दुकानदाराला शिक्षा व्हावी. आम्हाला न्याय मिळावा ज्यांना शिधापत्रिका नाहित अशांना कार्ड मिळावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.