शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

१०६ वर्षांच्या नागभीड पॅसेंजरला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

नॅरोगेज असलेल्या या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार असून १ डिसेंबर पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तत्पूर्वी ही मीनी पॅसेंजर बंद करण्याचा रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या पॅसेंजरची शेवटची फेरी होती. १९९३ पासून ही गाडी नॅरोगेज रेल्वे मार्गावरून अखंडपणे धावत होती.

ठळक मुद्देरेल्वे मार्गाचे विस्तारीकरण : शेवटच्या दिवशी अनेकांनी केला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तब्बल १०६ वर्षापासून प्रवाशांसाठी अखंडपणे सेवा देणाऱ्या नागपूर नागभीड मिनी पॅसेंजर यापुढे या मार्गावरून धावणार नसल्याने शेवटच्या दिवशी तिला प्रवाशांनी भावपूर्ण अखेरचा निरोप दिला.
नॅरोगेज असलेल्या या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार असून १ डिसेंबर पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तत्पूर्वी ही मीनी पॅसेंजर बंद करण्याचा रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या पॅसेंजरची शेवटची फेरी होती. १९९३ पासून ही गाडी नॅरोगेज रेल्वे मार्गावरून अखंडपणे धावत होती.
नागपूर ते नागभिड पर्यंतच्या गावांसाठी ही गाडी अत्यंत सोयीस्कर होती. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी नोकरवर्गातील प्रवाशी सुद्धा याच गाडीने आवडीने प्रवास करीत होते. १९५२ पासून रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी मागणी सुरु होती. या मागणीचा पाठपुरावा झाला मात्र अपेक्षित पाठपुराव्याअभावी ही मागणी अर्धवट राहिली. तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात १०६.१५ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गांना ब्रॉडगेड करण्याची परवानगी देण्यात आली होती. ही गाडी बंद झाल्याने अनेक प्रवाशांनी गाडीच्या अखेरच्या दिवशी भावपूर्ण जड अंत:करणाने निरोप दिला.

अर्थसंकल्पात तरतूद
तत्कालीन रेल्वे मंत्र्यांच्या कार्यकाळात या गाडीला ब्रॉडगेज करण्याची परवानगी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली नव्हती. परंतु या मार्गासाठी अंदाजे ७०८.११कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार असल्याचे कळते. ९२२ कोटी रुपयांच्या निधीतून १०६.१५ किमी विस्तारीकरणाला आता येत्या १ डिसेंबर पासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. विस्तारीकरणानंतर नागभिड मार्ग हा चंद्रपूर मार्गे वडसा गडचिरोली सोबतच मुंबई नागपूर गोंदिया कोलकाता तर दुसरीकडे चंद्रपूर मार्गे हैद्राबादला जोडला जाणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे