शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालय पाच महिन्यांपासून अंधारात

By admin | Updated: June 1, 2016 01:50 IST

प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते

पाच वर्षांपासून प्रभारी अधिकारी : वीज बिल न भरल्याने कामे खोळंबली लाखांदूर : प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते याचे उत्तम उदाहरण येथील भूमिअभिलेख कार्यालयात तालुक्यातील नागरिकांना पाच वषार्पासून बघायला मिळत आहे. वीज पुरवठा खंडीत, पाण्याची समस्या यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने कामे खोळंबली आहेत.तालुक्याच्या ठिकाणी नागरिक व शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हावी, यासाठी उघडण्यात आली. या कार्यालयाअंतर्गत ६३ ग्रामपंचायत व ७९ गावाचा कारभार चालतो. शेतकऱ्यांचे शेती व जमिनीसंदर्भात महत्त्वाचे दस्ताऐवज या कार्यालयात राखून ठेवले जातात. शासनाच्या नविन धोरणानुसार आता शेतकऱ्यांना आनलाईन दस्ताऐवज मिळणे सुरू झाले. महत्त्वाच्या कार्यालयाच्या यादीत हे कार्यालय महत्त्वाची भुमीका बजावत असताना प्रशासन व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे कार्यालय बेभरवशाचे झाले आहे. मागील पाच वषार्पासून या कार्यालयात प्रभारी मुख्य अधिकारी म्हणुन नियुक्ती असल्याने. कर्मचाऱ्यावर वचक राहिला नाही. मागील पाच महिण्यांपासून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. संपुर्ण उन्हाळ्यात येथील कर्मचारी उष्णता अंगावर झेलुन काम करताना दिसत होते. मात्र मानसिकता बिघडत असल्याने कर्मचारी कामे टाकून कार्यालयाबाहेर पडून थंडाव्याच्या शोधात फिरताना दिसतात.विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सर्व आनलाईन कामे मागील पाच महिण्यापासून बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाल्याने कार्यालयीन कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकावर येथील काही कर्मचारी कामे करुन न देता अर्वाच्च शब्दात बोलुन हाकलुन लावल्याचा प्रकार येथील अर्जनविस दररोजच अनुभवतात. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करून न शासकीय कामे नियमित सुरु करण्याची तसेच कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्तीची मागणी नगरपंचायस्त सदस्य प्रल्हाद देशमुख यानी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)