शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

लालपरी थांबल्याने एक कोटी ३८ लाखांचा बुडाला महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST

ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. केवळ अत्यावश्यक कामानिमित्त कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेला बसस्थानकात स्मशान शांतता पसरली आहे.

ठळक मुद्देतुमसर आगार : लॉकडाऊनने २३ दिवसांपासून ७० बसगाड्या उभ्या

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लॉकडाऊन काळात गत २३ दिवसांपासून एसटीची चाके थांबली आहेत. तुमसर आगाराचा एक कोटी ३८ लाखांचा महसूल बुडाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार महसूल मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा आगार आहे. सदर आगारात ७० बसगाड्या असून दररोज २१ हजार किमीचा प्रवास करतात.ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. केवळ अत्यावश्यक कामानिमित्त कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेला बसस्थानकात स्मशान शांतता पसरली आहे.एसटी महामंडळाच्या इतिहासात प्रथमच इतके दिवस बसगाड्या उभ्या आहेत. तुमसर आगारातून लांब पल्ल्याच्या बसगाड्या अकोला, राजूरा, परतवाडा, माहूर येथे दररोज फेºया आहेत. सुरक्षित प्रवासाकरीता प्रवाशांची एसटीलाच प्रथम प्राधान्य देतात.तुमसर आगारात एकूण ७० बसगाड्यांचा समावेश आहे. दरदिवशी सहा लाखांचे उत्पन्न येथे एसटीला मिळतो. २३ दिवसोचे सुमारे एक कोटी ३८ लाख रुपयांच्या महसूलाला महामंडळाला मुकावे लागले. तीन मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने पुन्हा एसटीला थांबण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. गाव खेड्यात प्रवासाचे एकमेव साधन एसटी बंद पडली आहे.एसटी गाड्या कायम एकाच जागेवर उभ्या असल्याने लॉकडाऊनपुर्वी त्यांचे मेन्टेन्स महामंडळाला करणे आवश्यक आहे. संचारबंदीनंतर एसटी पूर्ववत रस्त्यावर धावण्याची प्रतीक्षा येथे सर्वसामान्यांना आहे.तुमसर आगार लॉकडाऊनने बंद असून दरदिवशी सुमारे सहा लाखांचे उत्पन्न होते. गत २३ दिवसांपासून एसटी आगारात उभ्या आहेत. कोरोनाचा हा फटका आहे.-युधिष्ठीर रामचौरे, आगारप्रमुख, तुमसर.

टॅग्स :state transportएसटी