शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरात पैसेवारी विरोधात शेतकऱ्यांचे धरणे

By admin | Updated: December 21, 2015 00:39 IST

तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली...

दुष्काळ घोषित करा : हजारो शेतकऱ्यांचा सहभागलाखांदूर : तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली असल्याने ती रद्द करुन ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहिर करुन लाखांदूर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीला घेऊन हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.चालू वर्षात पावसाची सरासरी निम्यावर आली. तर रोगामुळे धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुरता सापडला. पिक कर्ज, सावकराकडील कर्ज, उसनवार रक्कम घेतल्याने व उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी रडकुंडीवर आला. अशातच प्रशासनाने इंग्रजकालीन १०० वर्ष जुनी आणेवारी व उंबरठा पद्धतीन काढलेली आणेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त येत नसतांना तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून कापणी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन आणेवारी ५० टक्केपेक्षा जास्त नोंदवून शासनाला सादर केली असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला. खुद्द टेंभुर्णे यांनी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात १२ प्लॉट आणेवारी काढण्यासाठी दिले होते. त्यांची भेट घेवून तपासले असता तलाठ्यानी केलेले पंचनामे व टेंभुर्णेसह शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले पंचनामे यात मोठी तफावत दिसून आली. एकूणच तलाठ्यांचे पंचनामे बनावट असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाच्या आणेवारीला विरोध केला. यापुर्वी अशाच प्रकारे आणेवारी चूकीची काढल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे, यांनी आंदोलन केले होते. अखेर प्रशासनाने माघार घेत ३४ गावातील आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी केली होती. त्यामुळे तलाठयांच्या बेजवाबदारपणाच्या निषेधार्थ व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत व बॅकेतील सोनेतारण कर्ज माफ करावे, या मागण्यांना घेवून शेतकऱ्यांचा उपस्थीतीत धरणे आंदोलन समाजकल्याण सभापती चंद्रशेखर यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती वासूदेव तोंडरे, देवचंद कावळे, भोजराज राऊ त, मनोज ढेंगरी, प्रानेश्वर कावठे, दिगांबर साठवणे, काशीनाथ हत्तीमारे आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)