शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यात धान उत्पादक वळतोय प्रयोगशील शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:11 IST

पारंपारिक पीक पध्दतीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. प्रचंड मेहनत करुनही हाती काहीच उरत नाही, त्यामुळे आता परंपरागत पीक पध्दतीला फाटा देत शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहे. लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील एका शेतकऱ्याने जलयुक्त शिवारच्या साथीने एकात्मिक पीक प्रयोग यशस्वीपणे राबविला. फळ पीक, भाजीपाला, कुकुटपालन, मुक्त गोठा पध्दत आणि शेततळ्यात मत्सपालन अशा प्रयोगातून मदतीचा नवा मार्ग स्विकारला आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारची साथ : एकात्मिक पिकांचा सोनेखारीत प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पारंपारिक पीक पध्दतीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. प्रचंड मेहनत करुनही हाती काहीच उरत नाही, त्यामुळे आता परंपरागत पीक पध्दतीला फाटा देत शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहे. लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील एका शेतकऱ्याने जलयुक्त शिवारच्या साथीने एकात्मिक पीक प्रयोग यशस्वीपणे राबविला. फळ पीक, भाजीपाला, कुकुटपालन, मुक्त गोठा पध्दत आणि शेततळ्यात मत्सपालन अशा प्रयोगातून मदतीचा नवा मार्ग स्विकारला आहे.लाखनी तालुक्यातील सोनेखारी येथील देवराम कातोरे यांची शेती काही दिवसांपूर्वी जवळपास पडीक होती. धान पिकातून काहीही हाती येत नव्हते. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाची वाट चोखाळली. आपल्या शेतालगत जलयुक्त शिवार योजनेच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळे बांधण्यात आले. या शेततळ्यातील तुडूंब पाण्याने त्यांच्या घरी समृध्दी आणली. शेतातील विहीरी पाणी पातळी वाढल्याने त्यानी आपल्या शेतात कारले, भेंडी, पपई असे बहूविध पीक लावले. शेततळ्याच्या काठावर बोर, चीकू, आंबा आदी फळपीक लावले, आता त्यांचे पीक चांगलेच बहरत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.देवराव कातोरे यांनी आपल्या शेतात मुक्त गोठा पध्दतीचा वापर केला असून यामुळे जनावर शसक्त आणि रोगमुक्त राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याच शेतात त्यांनी नाडेफ कम्पोस्ट खत आणि गांढूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. आता त्यांच्या शेतात भाजीपाला व फळपीक येवून त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच होणार आहे.पीक संरक्षणासाठी ग्रो-कव्हरपिकांचे सर्वाधीक नुकसान होते ते किडींमुळे. पीक लहान असतांना किडींना बळी पडते हा प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच त्यांनी ग्रो-कव्हर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संपूर्ण पीक प्लास्टिक सदृष्य ताडपत्रीने झाकण्यात आले. या तंत्रज्ञानासाठी एकरी केवळ पंधरा हजार खर्च येतो. आत आवश्यक तेवढा सुर्यप्रकाश जावून पीकही सुरक्षीत राहते. शेतकऱ्यांनी या पध्दतीचा वापर करावा असे आवाहन देवराव कातोरे यांनी केले आहे.पारंपारिक शेती भरोशाची नाही. बहुविध पीक पध्दती व एकात्मीक पीक प्रयोग यामुळे पीक उत्पादन वाढल्याचे दिसून येते. ज्यांच्याकडे अधीक शेती आहे. त्यांनी जलयुक्त शिवारच्या साथीने बहुविध शेतीचा अवलंब केल्यास निश्चित फायदा होईल.- पद्माकर गिरमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी