शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची सून ज्योती, तर चंद्रमाला ठरली आईतुल्य सासू

By admin | Updated: July 1, 2014 01:20 IST

लोकमत सखी मंच भंडारातर्फे सासु-सून संमेलन अंतर्गत सून माझी लाडाची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांकाची लाडाची सून ज्योती तर चंद्रमाला गांधी ठरली आईतुल्य सासू.

भंडारा : लोकमत सखी मंच भंडारातर्फे सासु-सून संमेलन अंतर्गत सून माझी लाडाची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांकाची लाडाची सून ज्योती तर चंद्रमाला गांधी ठरली आईतुल्य सासू. जिल्हाभरातून सखी स्पर्धक व सदस्यांनी कार्यक्रमात उदंड सहभाग नोंदविला.स्पर्धेचे उद्घाटन उदापुरे ज्वेलर्सचे संचालक आकाश उदापुरे यांनी केले. यावेळी मंचावर एस.बी. डिजिटल बॅनरचे संचालक सोनल भरणे, लोकेश गेडाम व संध्या किरोलीकर उपस्थित होते. सरस्वती स्तुती गाण सपना गोस्वामी यांनी गायले. सून माझ्या लाडाची कार्यक्रमात सखी इतक्या भावूक झाल्या की स्पर्धकांनी आपल्या भावना प्रकट करताच उपस्थितांचे डोळे साहजिकच पानावले. कुणाला तर काही शब्दच सुचेना. परंतु शब्दांचा अर्थ मात्र त्यांच्या अश्रूंनी पूर्ण केला.स्पर्धेमध्ये चंद्रमाला व ज्योती गांधी या सासू-सुनेच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मंगला व पूनम डहाके तृतीय क्रमांकाकरिता राधिका व विशाखा जिभकाटे चतुर्थ यशोदा व मीना खोत तर श्यामल व उर्मिला दलाल यांना पाचव्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस ललिता व प्रतिभा रंभाड आणि गयाबाई व विजया बांडेबुचे यांच्या जोडीने प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण संध्या किलोरीकर व दुर्गा डोरले यांनी केले. कार्यक्रमात मेघा पराते, हेमलता मासूरकर, सुनंदा तईकर, किरण बारापात्रे, वंदना गुरूमुखी, पुष्पा नंदेश्वर, नीतू डेकाटे, वैशाली पडोळे, स्मिता साठवणे, संध्या हलमारे व प्रतिभा चिरवतकर यांनी नृत्य सादर करून रंगत आणली. दिग्दर्शन पूनम रहिले यांनी केले.संचालन जिल्हा संयोजक बाल विकास मंच ललित घाटबांधे व आभार सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. युवा नेक्स्ट सखी मंच व बालविकास मंच यांच्या कार्यक्रमाची वार्षिक यादी युवा नेक्स्ट संयोजिका ग्रीष्मा खोत यांनी प्रेक्षकांसमोर सादर केली. वार्ड संयोजिका चंदा मुरकुटे यांनी आपल्या रेखीव रांगोळीने सर्व आमंत्रितांचे स्वागत केले. माधव तिघरे व राजेश पराते यांनी कार्यक्रम नियोजनात सहकार्य केले. वार्ड संयोजिका सुहासिनी अल्लडवार, राखी सूर, कल्पना डांगरे, मेघा नारायणपुरे, मनीषा रक्षिये, भावसागर, लतिशा खोत व स्रेहा वरखडे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)