शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधाचा अभाव

By admin | Updated: February 7, 2015 23:18 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटर पर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला

प्रकाश हातेल - चिचाळविदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटर पर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला पाण्याने वेढले असून काहीचे घरात पाणी शिरले आहे. मात्र पुनर्वसन गावठाणात अद्यापही अठरा नागरीसुविधा पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे ग्रामस्थामध्ये रोष असून आधी पुनर्वसन नंतरच स्थलांतरण करण्याचा पवित्रा सरपंच राजहंस भुते व ग्रामस्थांनी घेतला आहे.इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनात सौंदळ हे गाव प्रकल्पाच्या पोटात असून नदी शेजारी वसले आहे. गावात ३३८ कुटंूब व ७९२ लोकसंख्या आहे. प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने १३४ कुटूंबाचे गावठाण चकारा येथे स्थलांतरण झाले तर ज्यांना भुखंड मिळाले नाही त्यांचे घराचे चारही भोवती पाण्याने वेढले आहे. पाण्या शेजारील कुटूंब, साप, विच्छू आदी जलचर पाण्यापासून भित भित दिवस काठीत आहेत.पूनर्वसन गावठान चकारा येथे १३४ कुटूंबाचे स्थलांतरण झाले आहे. बाकी २०४ कुटूंब, शाळा, ग्रामपंचायत नवीन गावठाणात स्थलांतरण झाले नाही. त्यामुळे स्थलांतरीत कुटूंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.शासनाने ज्यांना भुखंड दिले नाही त्यांना तात्काळ भुखंड द्यावे त्यामुळे ते जुने गावठाण सोडतील, जुने विद्युत मिटर नवीन पुनर्वसनातील घरी ट्रान्सफर करून द्यावे, पाण्याखाली आलेल्या सुरबोडी येथील शेतीचे अनुदान देण्यात यावे, नवीन गावठाणात मकान बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करावी व उघड्या विहीरीचे तोंडीचे बांधकाम करण्यात यावे, बंद हॅन्डपंप, विद्युत पथदिवे सुरू करावे. पाणी वाहून नेणारी नाही. जमीनदोस्त झाल्याने नालीचे बांधकाम नव्याने करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना पेन्शन योजना व बीपीएलचा लाभ देण्यात यावा, कुटूंबाची संख्या पाहुण प्रकल्पग्रस्तांना शेती खरेदी करून द्यावी, जुन्या गावठाणातील वाढीव बांधकामाचा मोबदला देण्यात यावा, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या घराचा मुल्यांकन करून मोबदला देण्यात यावा, ढिवर समाज बांधवांना प्रकल्पात मच्छिमार करण्याचा अधिकार देण्यात यावा, ज्यांना नवीन गावठाणात भुखंड मिळाले परंतु त्यांना पॅकेजचा लाभ मिळाला नाही, त्या कुटूंबाना लाभ देण्यात यावा, सौंदळ, खापरी येथील काही घर टॅक्स धारकांना भुखंड व पॅकेजचा लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देण्यात यावा. सौंदळ, खापरी येथील हनुमान मंदीर व बौद्ध विहाराला भुखंड देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी १५ लाख रूपये देण्यात यावे, सौंदळ गटग्रामपंचायत मधील सुरबोडी या गावाची शहानिशा करून त्याचे पुनर्वसन करण्यात यावे. नवीन गावठाणात अठरा नागरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या पूर्ण करून द्याव्या, प्रकल्पबाधीत गावठाणातील व पुनर्वसन गावठाणातील संपूर्ण समस्या सोडविल्याशिवाय गाव सोडणार नाही, असे वरिष्ठांना निवेदन देवून सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते व प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.