कोंढा परिसरात संततधार पाऊस पडते आहे. त्यामुळे सगळीकडे रस्त्यावर चिखल पसरले आहे. घरांच्या शेजारी आजूबाजूला गवत व झाडे झुडपे वाढली आहे. अशा परिस्थितीत दिवस, रात्रीला वीजपुरवठा खंडित वारंवार होत आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विजेचे बिल थकीत झाले तरी वीज कापण्यासाठी घरी येतात. पण वारंवार होत असलेल्या वीज खंडित होत आहे याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे, पाऊस येत असताना विजांचा कडकडात होते, तेव्हा वीज जाणे हे समजू शकते. पण शुभ्र वातावरणात नियमित वीज खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची रात्रीला झोप मोडणे आहे. सिंगल फेज लाईन कालबाह्य ठरली आहे. त्यामुळे तेथे नवीन थ्री फेज लाईन पसरविणे गरजेचे आहे. कृषी पंपाची लाईन रात्रीला वारंवार खंडित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात डासांचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच डेंग्यूचे रुग्ण परिसरात वाढत आहे. खंडित विजेचा पुरवठा बंद करून नियमित पुरवठा देण्याची मागणी कोंढा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खंडित वीजपुरवठ्याने कोंढा व परिसरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST