शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: September 18, 2016 00:39 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा ...

विविध मागण्यांसाठी : जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनभंडारा : अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा भंडाराच्या वतिने शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.़ आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेच जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे होते़ या प्रसंगी झालेल्या सभेत म़ रा़ लालबावटा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस शिवकुमार गणवीर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व नगरसेवक हिवराज उके यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.प्रास्ताविक किसान सभेचे जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले़ यावेळी ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना १० हजर रुपये पेंशन द्यावे, तसा कायदा करण्यात यावा, २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, थकीत बील माफ करावे, आधारभूत किमंती पेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी-विक्री केल्यास गुन्हा दाखल करावा, स्वामीनाथन कमेटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव देण्यात यावा, वेळेवर धान खरेदी केंद्र सुरु करावे व ते प्रत्येक गावात सुरु करावे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, रेशन व्यवस्था मजबूत करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांनी स्विकारले़ शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, सदानंद इलमे, माधवराव बांते, हिवराज उके, माणिकराव कुकडकर, वामनराव चांदेवार, दिलीप ढगे, गोपाल वैद्य, अरुण पडोळे, राजु बडोले, आसाराम वैद्य, यांचा समावेश होता. धरणे आंदोलनात गजानन पाचे, मोहनलाल शिागंडे, ताराचंद देशमुख, प्रताप उके, झाडुजी वासनिक, स्वामी रविंद्र पंजाबी, अरविंद पाटील, प्रकाश रामटेके, राजु लांजेवार, ताराचंद आंबाघरे, अमित क्षिरसागर, चांगेश्वर मांढरे, देविदास कान्हेकर इत्यादींचा समावेश होता़ (नगर प्रतिनिधी)