शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रमातून समृद्धीचा मळा फुलविणारा किन्हीचा शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

संतोष जाधवर भंडारा : शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली ...

संतोष जाधवर

भंडारा : शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथील शेतकऱ्याने समृद्धीचा मळा फुलविला. त्यांच्या या परिश्रमावर शासनाची मोहर लागली. घनश्याम बळीराम पारधी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला. त्यांनी शेतीत केलेल्या बदलाचे रहस्य उलगडण्यासाठी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.

साकोली तालुक्यातील किन्ही मोखे गाव शेतीवर अवलंबून. याच गावात एक अल्पभूधारक शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. घनश्याम पारधी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. आपसूकच शेती कसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. १९९७-९८ पासून त्यांनी शेती कसणे सुरू केली. सुरुवातीपासूनच परिश्रमाची जोड देत त्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले. १९९८ साली मिलिंद ढोणे या कृषी सहायकांशी त्यांची गाठ पडली आणि तेथून सुरू झाली आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कसण्याची पद्धत. शेतकरी प्रशिक्षण, नवनवीन ज्ञान मिळविण्याची आवड यातून त्यांनी शेतीचे चित्रच पालटले. अवघ्या साडेचार एकर शेतीत त्यांनी हे सर्व प्रयोग केले.

आधुनिक तंत्रज्ञानासोबतच विषमुक्त शेती पिकविण्याचा ध्यास घनश्याम पारधी यांनी घेतला. आजही ते अडीच एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीनेच धान पिकवितात. बीबीएफ पद्धतीचा अवलंब करून त्यातून एकरी १२ ते १४ क्विंटल धानाचे उत्पन्न काढतात. विशेष म्हणजे या विषमुक्त धानाला इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक दर मिळतो. जय श्रीराम जातीच्या धानाला साधारणत: ४० ते ४५ रुपये दर मिळत असल्याचे घनश्याम पारधी सांगतात.

धानासोबतच त्यांनी विषमुक्त भाजीपाल्याचा प्रयोगही आपल्या शेतात सुरू केला. बोर वृक्षाची लागवड केली. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. या सर्वांमध्ये त्यांना कृषी विभागाचे मिळालेले मार्गदर्शन बहुमूल्य ठरले. साकोली कृषी अधिकारी वृषाली देशमुख, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, कृषी सहायक परशुरामकर, स्मिता मोहरकर, कृषी मंडळ अधिकारी मेश्राम आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. अशा या शेतकऱ्याचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला असून, त्यांना २०१९ सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला आहे.

बाॅक्स

शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन

घनश्याम पारधी यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही त्यात सहभागी करून घेतले. शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. शेती विषयातील नवनवीन ज्ञान आत्मसात करून ते आपल्या सहकारी शेतकऱ्यांना सांगतात. इतरही शेतकरी त्यांचा आदर्श घेत शेती करीत आहेत.

कोट

आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. दहा वर्षांपासून शेती कसत आहे. रासायनिक खतांचा अतिरेक कमी करून विषमुक्त पीक घेतले जात आहे. भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात विषमुक्त पीक पिकविले जाईल. हा माल परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न आहे.

-घनश्याम पारधी, शेतकरी किन्ही (मोखे)