शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:15 IST

घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली.

पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न : मोहाडी (खापा) येथील घटना चुल्हाड/तुसमर : घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली. दुखापत झाली आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून हरेंद्र जयेंद्र शरणागत (२१) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील मोहाडी (खापा) येथे २५ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सिहोरा येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या मोहाडी (खापा) गावात जयेंद्र शरणागत याच्या कुटुंंबात पत्नी आणी मुले आहेत. जयेंद्र शरणागत याला दारुचे व्यसन आहे. २५ आॅगस्ट सायंकाळी जयेंद्रने पत्नी आणि मुलाला दारुकरिता पैसे मागितले. पंरतु त्यांनी जयेंद्रला पैसे दिले नाही. यामुळे जयेंद्रने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून जयेंद्रने आधी पत्नी शामकला शरणागत हिला जबर मारहाण केली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाद सुरु असतानाच जयेंद्रने मुलाच्या डोक्यावर लोखंडी सबळीने मारहाण केली. जखमी हरेंद्र व त्याची आई शामकला हिला उपचारासाठी गावकऱ्यांनी खाजगी दवाखान्यात नेले. नागपुरला नेत असताना त्याची प्राणज्योत मालविली. इकडे घरात असलेल्या जयेंद्र शरणागत याने दुसऱ्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी त्याला वाचविले. हरेंद्र हा कला विद्यालय सिहोरा येथे द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. जयेंद्र शरणागत याला दारुचे वेसन जडले होते. यामुळे पैशाचे मागणी वरुन त्याचे रोजचे घरात भांडण सुरु होते. यामुळे त्याचा एक मुलगा शैलेंद्र हा गुजरात राज्यात रोजगार निमित्त निघून गेला. घरात पत्नी, हरेंद्र आणि एक १७ वर्षीय मुलगी आहे. फिर्यादी दुर्गा शरणागत यांचे तक्रारीवरुन जयेंद्र शरणागतविरूद्ध भादंवीच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला त्याच्या घरातुन सिहोरा पोलिसांनी अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम माळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश झायले करीत आहेत.मोहाडीत गुन्हेगारी वाढतेयचुल्हाड-चांदपूर मार्गावरील पंचायत समिती क्षेत्र असलेल्या मोहाडी (खापा) गावात घरगुती वादातुन गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. या आधी भावाने बहिनीची हत्या केली असून सावत्र भावाने कुटूंबातील संपत्तीच्या वादातून सख्खा भावाचा ५ जणांचा कुटूंब व वडीलाला यमसदणी पाठविल्याची घटना याच गावातील आहे. या शिवाय प्रियकराच्या मदतीने पतीला ठार करण्यात आले होते. मोहाडीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)जयेंद्र शरणागत याने घरगुती वादातुन मुलगा हरेंद्र यांची हत्या केल्याचे कळते. पत्नीला जबर मारहाण केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. - नागेश झायलेसहायक पोलीस निरीक्षक, सिहोरा