शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खापावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार, आमदारांना घेराव घालणार

By admin | Updated: September 4, 2016 00:32 IST

येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी जमावाने आपले गऱ्हाणे ऐकवण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

कल्याणी भुरे : पीडिताच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची मदत द्यातुमसर : येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी जमावाने आपले गऱ्हाणे ऐकवण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. येथील आमदार, खासदार यांनी दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. आठवडाभरात खापावासीयांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर आमदार, खासदारांना घेराव घालणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, पमा ठाकूर, उषा जावळे, अंकुर ठाकूर उपस्थित होते. यावेळी भुरे यांनी, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांचे बेहाल झाले आहेत. रूग्णालयात तीन स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञाची जागा असताना केवळ एकच जागा भरण्यात आली आहे. इथल्या परिचारिकांच्या उर्मठ वागणुकीमुळे जनता त्रस्त झाली आहे. डॉक्टर मुख्यालयी राहत नाही आदी समस्या असताना आमदारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. परिणामी अशा घटनांना सामोरे जावे लागते व नागरिक जेव्हा प्रशासनाचा विरोध करतात त्यांच्या चुका त्यांच्या समोर दाखविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. या अगोदरही आंदोलन, रास्तारोको करण्यात आले. परंतु कधीच असे घडले नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांना शेवटपर्यंत समजाविण्याचा कार्य केले. मात्र त्यांनाही हेतुपुरस्सर या प्रकरणात गोवण्यात आले व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच बरोबर गावातील इतरही नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले जाणार आहे. असे असताना येथील आमदार, खासदारांनी मौन बाळगले आहे. शासनस्तरावर प्रयत्न करून खापा वासीयांवरील गुन्हे मागे घेणे, लाठी चार्जचे आदेश देणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करणे तसेच पीडिताच्या परिवाराला १० लाख रूपयाची मदत करणे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी समोर येऊन आमदार खासदारांना घेराव घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)