शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समितीच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: October 4, 2014 23:21 IST

शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली.

चिचाळ : शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली. मात्र गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा उपयोग काय असा प्रश्न समिती करीत आहे.शासनाने मुख्याध्यापकावरील कामाचा कार्यभार लक्षात घेऊन त्यांचे कडील सोपविलेल्या शालेय पोषण आहाराची जिम्मेदारी कमी करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी करून राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळेला देण्यात आले. त्यानुसार पवनी तालुक्यातील प्राथमिक शाळा खैरी येथे शाळा व्यवस्थापन समितीने गावात दवंडीद्वारे सूचना देऊन २ जुलैला सभा घेतली. या सभेत शारदा माता बचत गट खैरी, लक्ष्मी महिला बचत गट पंचशील महिला बचत गट व अहिल्याबाई महिला बचत गट उपस्थित झाले. त्यामुळे ईश्वरचिट्टीने महिलांची निवड करण्यात आली. त्यात शारदा माता महिला बचत गटाची निवड करण्यात आली. त्या नुसार सदर गटांच्या महिला शाळेत आहाराचे काम देण्यात आले. मात्र त्यानंतर जुन्याच महिलांकडो मध्यान्ह भोजनाची जबाबदारी देण्याचे पत्र शाळेला पाठविण्यात आले. त्यानुसार जुन्या स्वयंपाकी व मदतनिस यांचे काम समाधान कारक नसल्याने त्यांना परत नियुक्ती देण्यात येवू नये असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र त्या पत्रात स्वयंपाकी यांचे काम समाधानकारक नसेल तर मात्र विहित प्रक्रियेचा अवलंब करून त्या ठिकाणी नवीन नियुक्ती देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला कार्यवाही करता येईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही व शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव देवूनही गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाला जुमनात नसल्याने सदर शाळेच्या मुख्याध्यापकाला मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.सदर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास व पुन्हा जुन्या आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती केल्यास शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांच्या टी.सी. काढण्याचा इशारा पालकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामलाल खऊळ, निर्मला नान्हे, हर्षा तुपटे, सुनिता पारधी, माधुरी पारधी, छाया पडोळे, शिला ढेंगर, अशोक मांढरे, कैलाश मेश्राम, शेषराव कुथे, शालीनी आठवले व पालकांनी केली आहे.(वार्ताहर)