तार कुंपणातील विजेच्या धक्क्याने इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST2021-09-18T04:38:25+5:302021-09-18T04:38:25+5:30

माणिक ढेकल भैसारे (५०) रा. एकोडी ता. साकोली असे मृताचे नाव आहे. तो मित्र मनोज रामकृष्ण जांभुळकर याच्यासोबत शुक्रवारी ...

Ism was killed by an electric shock in the wire fence | तार कुंपणातील विजेच्या धक्क्याने इसम ठार

तार कुंपणातील विजेच्या धक्क्याने इसम ठार

माणिक ढेकल भैसारे (५०) रा. एकोडी ता. साकोली असे मृताचे नाव आहे. तो मित्र मनोज रामकृष्ण जांभुळकर याच्यासोबत शुक्रवारी सकाळी खेकडे पकडण्यासाठी गावाबाहेर नाल्याकडे जात होते. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या तार कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता; मात्र या दोघांना याची कल्पना नसल्याने ते बिनधास्त जात होते. त्यावेळी माणिकचा वीज प्रवाहित तारेला स्पर्श झाला. काही कळायच्या आत विजेचा जोरदार झटका बसून तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार मित्र मनोज याला दिसताच त्याने गावाकडे धूम ठोकली. घडलेल्या प्रकारची माहिती गावात दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच साकोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकोडी चौकीचे कर्मचारी टिकाराम लेंडे, नीलेश रामटेके करीत आहेत.

Web Title: Ism was killed by an electric shock in the wire fence