शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी यंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी

By admin | Updated: July 26, 2014 23:58 IST

आत्मा भंडारा व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मशीन यंत्राद्वारे रोवणीचे प्रात्यक्षिक निलज खुर्द येथील शेतकरी मदनपाल भोयर यांचे शेतावर झाले.

युवराज गोमासे - करडी(पालोरा)आत्मा भंडारा व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मशीन यंत्राद्वारे रोवणीचे प्रात्यक्षिक निलज खुर्द येथील शेतकरी मदनपाल भोयर यांचे शेतावर झाले. करडी मोहगाव रोड लगतच्या शेतावर दाखविण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाचा लाभ करडी परिसर आणि तुमसर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी घेतला. प्रती दिवस ३ एकर शेतीची रोवणी करण्याची क्षमता मशनीची असल्याची माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.प्रात्यक्षिकाचेवेळी मोहाडी पंचायत समिती उपसभापती उपेश बांते, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष वासूदेव बांते, निलज खुर्दचे सरपंच संजय भोयर, मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, तुमसर तालुका कृषी अधिकारी दौलत गभणे, मंडळ कृषी अधिकारी एन.के. चांदेवार, युवराज गोमासे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोवणी करणारी मशीन तयार झाल्याने शेतकऱ्याची वेळ, श्रम व पैशाची बचत होईल. शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर गोळा करण्याची मेहनत कमी होईल. कृषी विभागाकडून भात रोवणीची मशीन अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांनी भात पिकाची रोवणी करण्यासाठी पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घ्यावी. मशीनने रोवणी करण्याची पद्धत सहज व सोपी आहे. रोवणी करण्यासाठी मजुरांची संख्या ४ ते ५ लागते. रोपवाटीकेसाठीही जागा कमी लागते. बियाणे सुद्धा कमी लागतात. दोन ओळीमधील अंतरही एकसमान राखता येते. कुटूंबातील सदस्यांकडूनही रोवणी करता येवू शकते. मानवी श्रमाची बचत होवून रोवणीचा खर्च कमी होतो, तेव्हा यांत्रिकीपद्धतीचा वापर करावा, असे आवाहनही कृषी विभागाचे वतीने करण्यात आले. प्रात्यक्षिकासाठी आत्माचे बोरकर, कृषी सहायक विश्वनाथ कवासे, सचिंद्र रंगारी, प्रिती डुकरे व शेतकरी मदनपाल भोयर यांनी सहकार्य केले.रोप नर्सरी तयार करण्याची पद्धतसर्वप्रथम खळे, गोटे मुक्त चिखल तयार करावे, प्लॉस्टिक अंथरूणावर चिखल साच्यांमध्ये टाकावे, त्यावर अंकुरित धान्य टाकल्यानंतर ते गांडूळ खताने झाकावे अशा पद्धतीने तयार झालेले १६ ते १८ दिवसाची रोपे मशीनने रोवणीसाठी वापरावे. एकरी १० किलो धान्य पुरेशे ठरतात. मशीनसाठी साचेबंद असलेले पऱ्यांचे १८० केक लागतात.