शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात मत्स्य शेतीचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

या संकल्पनेतून धानशेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणून मत्स्यशेतीचा प्रयोग कल्पना कापगते यांच्या शेतावर राबविण्यात आला. त्यांनी आत्मा व कृषी विभागाच्या मदतीने एक एकर शेतात हा मत्स्यव्यवसाय प्रकल्प राबविला आहे. यामध्ये शेतामध्ये चारही बाजूला दीड मीटर खोल व अडीच मीटर रुंद खड्डा तयार करून या खड्ड्यात केलेल्या जागेमध्ये रोहू, कतला, मृगळ, शिप्रस जातीच्या माशांचे ६०९ अर्धबोटुकली सोडण्यात आली.

ठळक मुद्देपारंपारिकतेला बगल : आत्माच्या मार्गदर्शनातून उभारला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखांदूर तालुक्यातील साखरा शिवारात असलेल्या एका महिला शेतकऱ्याने धान शेतीला जोड देत मत्स्य शेतीचा व्यवसाय आपल्या शेतात फुलविला आहे.
धानशेतीतील वाढलेला खर्च व त्यावर येणारे नवनवीन संकटे यामुळे धानशेती शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली. त्यामुळे अनेक शेतकरी शेती परवडत नसल्याची ओरड करीत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कल्पना कापगते या महिला शेतकºयाने वेगळे काहीतरी करण्याचा निश्चय केला. लाखांदूर आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल जवंजार यांच्या सततच्या मार्गदर्शनातून शेतीला जोड व्यवसाय करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेतून धानशेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणून मत्स्यशेतीचा प्रयोग कल्पना कापगते यांच्या शेतावर राबविण्यात आला. त्यांनी आत्मा व कृषी विभागाच्या मदतीने एक एकर शेतात हा मत्स्यव्यवसाय प्रकल्प राबविला आहे. यामध्ये शेतामध्ये चारही बाजूला दीड मीटर खोल व अडीच मीटर रुंद खड्डा तयार करून या खड्ड्यात केलेल्या जागेमध्ये रोहू, कतला, मृगळ, शिप्रस जातीच्या माशांचे ६०९ अर्धबोटुकली सोडण्यात आली. उरलेल्या भागात श्री पद्धतीने एक हजार १० जातीच्या धानपीकाची लागवड करण्यात आली. धानपीकामध्ये पूर्णत: सेंद्रीय खताचा वापर करत आहेत. जीवामृताचा १५ दिवसातून एकदा डोस देण्यात येत आहे. त्यामुळे धानाच्या फुटव्यांची संख्या लक्षण्य असून माशांना खाद्य म्हणून शेण, कुकुस, सोयाबीन ढेपचा वापर केला जातो. यात माशांच्या विष्ठेतून धानपीकासाठी खताचा उपयोग होत असल्याने धानपीक चांगले आले आहे.
तसेच शेताच्या चारही बाजूने तूर पीकाची लागवड केली असून बांधावर नवीन मातीमुळे तूरपीक ही दमदार आले आहे. त्यातून एकंदरीत धान, तूर, मत्स्य व्यवसाय असे एकंदरीत खर्च वजा करता तीन लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे महिला शेतकरी कल्पना कापगते व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल जवंजार यांनी सांगितले. तालुक्यातील हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी छाया कापगते यांनीही भेटी देत इतर शेतकºयांना प्रोत्साहीत केले आहे. त्यामुळे परिसरात कापगते यांचा हा प्रयोग आदर्श ठरत आहे. इतर शेतकºयांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे.
 

टॅग्स :agricultureशेती