शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:08 IST

तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देव्यथा ग्रामीण क्षेत्राची : आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनाच्या आरोग्यावर पडत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नुकताच कोजागिरीच्या कार्यक्रम पार पडला आहे. रात्रीच्या चांदण्यात दुध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दुध भेसळयुक्त असल्याने मानवी जीवनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे.हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात प्रत्येक दिवसाला २० ते २५ हजार लिटर दुधाची गरज असते.ज्याप्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणाची कमतरता भासत आहेत. दुधाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याचाच फायदा म्हणून दुधात भेसळ केल्या जाते. दुधात भेसळ लक्षात येऊ नये म्हणून दुग्ध व्यापारी वर्ग नानाविधी युक्त्या वापरल्या जातात.अशी केली जाते दुधात भेसळदुधाचे संकलन वाढविण्याची दुधात पाणी मिसळविले जाते. यासोबतच आरारुट पावडर, मालटोल, मक्यापासून बनविलेले पावडर, मिठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकेल तरी दूध घट्ट दिसते. मात्र यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम पडत आहे. पालोरा परिसरात अनेक अवैधरीत्या दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. दुधात भेसळ ओळखण्याकरिता संबंधित विभागाध्यक्ष यांना देण्यात आली. मात्र या मशीनी फक्त शोभेच्या वस्तू ठरत आहे.मिठाई बनविण्यासाठी होतोय वापरपालोरा, लोणारा, कुर्ला परिसरातून हजारो लिटर दुध दररोज कोंढा येथे पाठविल्या जाते. कोंढा येथे आलेल्या बाहेर देशातून आलेले काही व्यापारी गोड पदार्थाचा वापर करतात. यांना दुग्ध संकलन केंद्रातून दररोज हजारो लिटर दुध पुरवठा केला जातो. हा दुध पुर्णपणे भेसळ असून व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला जातो. यामुळे दुग्धव्यवसायीक व मिठाई विक्रेते मालामाल होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाव अल्पप्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आपले जनावरे विक्रीला नेत आहे. दुधात भेसळ करणारे जेवढे व्यापारी जबाबदार आहेत तेवढेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.