मानेगाव येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:33+5:302021-02-05T08:39:33+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभा, गिरीधर वायकुळे, शिवा देशमुख, भुमेश्वर चकोले आदी उपस्थित होते. मानेगाव ...

Inauguration of Paddy Procurement Center at Manegaon | मानेगाव येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

मानेगाव येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभा, गिरीधर वायकुळे, शिवा देशमुख, भुमेश्वर चकोले आदी उपस्थित होते. मानेगाव परिसरात धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे जात होते. त्यासाठी बासोरा येथील प्रसन्न चकोले व शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. कदम यांची भेट घेतली. त्यांनी धान केंद्र मंजूर करून दिले. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. कदम म्हणाले, मानेगाव सोसायटीला नवीन गोदाम प्राथमिक आरोग्य केंद्र व नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये त्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी संतोष डहारे, देवराम जगनाडे, रामेश्वर गायधने, शुभांगी सार्वे, छबिता डोरले, महादेव बडगे, राजकुमार वंजारी, राजू घरडे, मोहन खंगार, उदाराम निंबार्ते, रमेश भांडारकर, मोहन ठाकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रसन्न चकोले यांनी केले.

Web Title: Inauguration of Paddy Procurement Center at Manegaon