कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:24+5:30

लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा शेतकऱ्यांसाठी केवळ नाममात्र ठरत आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी खिंड पडली आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाने अद्यापही त्याची दुरूस्ती केली नाही.

Immediate repair of Kolhapuri dam | कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा

कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी, सिंचनासाठी होणार हजारो शेतकऱ्यांना मदत


लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम बाम्हणी-खडकी येथील दल्ली मार्गालगतच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची मागील १० वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याचा कसलाच उपयोग शेतकऱ्यांना होत नाही.
या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा शेतकऱ्यांसाठी केवळ नाममात्र ठरत आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी खिंड पडली आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाने अद्यापही त्याची दुरूस्ती केली नाही.
परिणामी बाम्हणी, खडकी व देवपायली या गावातील शेतकऱ्यांना सिंचनपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी बंधारा तयार केला.
यासाठी लाखो रु पये खर्च केले. मात्र आता संबंधित विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकऱ्यांना गत काही दिवसापासून सिंचनासाठी वंचित रहावे लागत आहे.

वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
हा कोल्हापुरी बंधारा नवेगाव-नागझिरा अभयारण्याला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची सोय तसेच भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली असती. मात्र यात पाणीच साचून राहत नसल्याने याचा कसलाच उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Immediate repair of Kolhapuri dam