शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा परिसरात अवैध सावकारी तेजीत

By admin | Updated: October 29, 2014 22:46 IST

राज्य शासनाने अवैध सावकारीला आळत्त घालण्यासाठी कडक कायदे केले तरी देखिल शेतकऱ्यांना व लहान व्यापाऱ्यांना खासगी, सावकार आपल्या जाळ्यात अडकवून परिसरात

कोंढा (कोसरा) : राज्य शासनाने अवैध सावकारीला आळत्त घालण्यासाठी कडक कायदे केले तरी देखिल शेतकऱ्यांना व लहान व्यापाऱ्यांना खासगी, सावकार आपल्या जाळ्यात अडकवून परिसरात त्यांच्याकडून शेकडा ३ ते ५ रूपये महिना व्याज वसूल करीत असल्याने शेतकऱ्यांना लुटत असल्याचे चित्र परिसरात दिसते आहे. या खासगी सावाकाराकडे कोणतेही शासकीय परवाने नाहीत. हे मात्र विशेष.कोंढा येथे दर बुधवारला प्रसिद्ध म्हैस बाजार भरते. येथे अनेक लहान, मोठे व्यापारी आहेत ते खासगी सावकाराकडून ८ दिवस १५ दिवस, ३० दिवस यासाठी हजारो रूपये घेतात. त्यासाठी ५ रूपये पासून १० रूपये प्रतिशंभरावर व्याज घेतले जात आहे. शेतकरी बांधव शेतीकरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी सावकाराकडून कर्ज काढत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. १ लाख रूपये कर्ज घेतल्यास १ एकर जागेची रजिस्ट्री सावकार करून मागत असतात. अशाप्रकारे ठराविक कालावधीत व्याजासहित पैसे परत न केल्यास जमिन खासगी सावकाराच्या मालकीची होत असते, असे प्रकार होत आहे. पैसे परत न केल्याने अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी हडप केल्या आहेत. पण याबद्दल शेतकरी देखिल आवाज उठवत नाही. त्यामुळे शोषणाचे प्रकार वाढले आहे. कोंढा परिसरात मागील तीन, चार वर्षापासून नैसर्गीक संकटे येत आहेत. अशावेळी शेतकरी कर्ज बाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वात जास्त फायदा खासगी सावकारांनी घेतला आहे. १ ते २ लाख रूपये उसणार घेवून जमिनीच्या रजिस्ट्री मारण्याचे प्रकार वाढले आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने खासगी सावकारीचा नाश करण्यासाठी कठोर कायदे केले, पण या कायद्याचा उपयोग होताना दिसत नाही तरी पोलीस प्रशासनाने अशा खासगी सावकारांचा शोध घेवून शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)