किटाडी येथे आगीत घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST2021-02-18T05:06:17+5:302021-02-18T05:06:17+5:30

अड्याळ-पालांदूर मुख्य मार्गालगत ज्ञानेश्वर भोयर यांचे घर आहे. मंगळवारी रात्री गाढ झोपेत असताना अंदाजे २-२३० वाजताच्या दरम्यान अचानक आग ...

A house was gutted in a fire at Kitadi | किटाडी येथे आगीत घर भस्मसात

किटाडी येथे आगीत घर भस्मसात

अड्याळ-पालांदूर मुख्य मार्गालगत ज्ञानेश्वर भोयर यांचे घर आहे. मंगळवारी रात्री गाढ झोपेत असताना अंदाजे २-२३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. ही घटना कुटुुंबीयांच्या लक्षात येताच आरडाओरड केली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. माहिती पसरताच गावकऱ्यांनी गर्दी केली होती. एक तास आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या आगीत रोख ४० हजार रुपये जळाले. तर मिक्सर मशीन, कुकर व इतरही भांडी त्याचप्रमाणे घरातील वस्त्र, फाटे, कवेलू आदी व जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली. घटनास्थळी भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय घाटबांधे, पोलीस पाटील प्रशांत धुर्वे, तलाठी लालचंद बावनकर, तर पंच म्हणून हरिचंद्र हेडाऊ उपस्थित होते. आग कशाने लागली ,याचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Web Title: A house was gutted in a fire at Kitadi