शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

दिवाळीला नातेवाईकांकडे जाताय, सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 5:01 PM

जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असून साकोलीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सणावाराला घरातील लोक बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेत चोरटे घरावर डल्ला मारत आहेत.

भंडारा : साकोली शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून लागोपाठ होत असलेल्या  चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

शहरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी १ लाख १४ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.   प्राप्त माहितीनुसार पंचशील वार्ड निवासी ग्रामसेवक राजू राऊत यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ६८ हजार रुपये व सोन्याच्या दागिन्यांसह एकूण एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच, याच घरामध्ये असलेल्या तीन वेगवेगळ्या किरायदारांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणी चोरांना काहीही सापडले नाही.

दुसऱ्या चोरीमध्ये संत लहरी बाबा मठ येथील दानपेटी फोडून चोरांनी १० हजार रुपये रोख  रक्कम लंपास केली. मागील दिवसात श्रीनगर कॉलनी येथे ग्रामसेवकाच्या घरातून १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. तर, पोस्टमास्टर यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

शहरात लागोपाठ होत असलेल्या चोरी वाढीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन कामी लागले असून श्वानपथक पाचारण करण्यात आले. यासोबतच दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये कुटुंबीय बाहेरगावी जात असल्यास त्याची पूर्वसूचना पोलीस ठाणे साकोली यांना द्यावी. तसेच  रोख रक्कम व दाग-दागिने ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी असे आवाहनही पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी शहरवासीयांना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyचोरी