शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडात घरकूल वाटपात घोळ

By admin | Updated: June 5, 2016 00:26 IST

गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी घरकूल योजना अस्तित्वात आणली आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा

पहिल्याला डावलून दुसऱ्याला लाभ : तक्रारीनंतर दुसऱ्या टप्प्याची रक्कम थांबविलीभंडारा : गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी घरकूल योजना अस्तित्वात आणली आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील ग्रामपंचायतीने घरकुल वाटपात घोळ केला आहे. तक्रारीनंतर पंचायत समिती मोहाडीने घरकूल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा आर्थिक मोबदला थांबविला आहे.नरसिंगटोला व देव्हाडा या दोन गावांची गट ग्रामपंचायत आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या देव्हाडा ग्रामपंचायतीने राजीव गांधी घरकूल योजनेसाठी पाठविलेल्या यादीतून निवड करण्यात आली. येथे ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना घरकूल मिळावे यासाठी ग्रा. पं. ने १ ते ७९ लोकांची मास्टर यादी तयार केली. या यादीत सुरुवातीला त्यांची नावे आहेत. अशाना डावलून प्रतीक्षा यादीत मागील नावे असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१५-१६ मध्ये ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समितीने ग्रामपंचायत मधून यादी मागितली. त्यानुसार ग्रामपंचायतीने देव्हाडा व नरसिंगटोला येथील ७९ नागरिकांची नावे घरकूलसाठी पाठविली.सदर यादी ग्रामपंचायत देव्हाडा व पंचायत समिती मोहाडी येथे प्रसिध्द करण्यात आली. मात्र घरकुलचा लाभ घेताना येथील सरपंच विना तुराम व ग्रामसेवक प्रीती तभाने यांनी संगणमत करुन प्रतीक्षा यादीत अनुक्रमनिकेत मागील भागात असलेल्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप देव्हाडा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर रंगारी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी रंगारी यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)