वैजेश्वर घाटात पवित्र स्रान :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:34 IST2016-09-07T00:30:49+5:302016-09-07T00:34:02+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी नगरात वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा ...

Holy place in Vaijeshwar Ghat: | वैजेश्वर घाटात पवित्र स्रान :

वैजेश्वर घाटात पवित्र स्रान :

वैजेश्वर घाटात पवित्र स्रान

पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी नगरात शेकडो प्राचीन मंदिर आहेत. त्यापैकीच एक असलेल्या वैजेश्वर मंदिरालगत वैनगंगा नदीकाठावर वैजेश्वर घाट आहे. दरवर्षी ऋषीपंचमीला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून महिला पवित्र स्नान करून पूजा करीत असतात. यावर्षी सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत हजारो महिलांनी ऋषीपंचमीनिमित पवित्र स्नान केले. भाद्रपद महिन्यातील पंचमीला दरवर्षी हे व्रत केल्या जाते. रजोनिवृत्त झालेल्या महिला या व्रतासाठी हजेरी लावतात. व्रतस्थ महिलांनी नदीवर जावून आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठाने दंतधावन करावे, आवळकाठी व तिष्ठ वाटून स्रान करून वस्त्र परिधान करावे. अरुंधतीसह सात ऋषींची पूजा करावी, असे हे व्रत असून बैलांच्या परिश्रमाशिवाय उत्पादीत धान्य व पालेभाज्यांचा स्वयंपाक येथे केला जातो. यात प्रामुख्याने देवतांदळाचा समावेश असतो. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातून पवित्र वैनगंगा नदीकाठावरील वैजेश्वर मंदिर व घाटावर हजारो महिलांनी पवित्र स्नानासाठी हजेरी लावली. व्रतस्थ महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे उपस्थित होते. वैजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर उरकुडकर, सचिव महादेव लिचडे, उपाध्यक्ष मधुकर फुलबांधे, सहसचिव सुरेश अवसरे, कोषाध्यक्ष प्रकाश पोटफोटे व सदस्यांनी ऋषीपंचमीचा कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले. पवन विद्यालयाचे राजेश येलशेट्टीवार यांनी स्काऊट गाईड मार्फत सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी सेवाभावी संस्था व व्यक्तींनी प्रसादाचे वितरण केले. नगरपालिकेने पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Holy place in Vaijeshwar Ghat: