मोहाडीत रस्त्यासाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:00+5:30

निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झालेले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झालेले असल्याने रस्ता पूर्णत: उखडलेला आहे.

Hold for road in Mohadi | मोहाडीत रस्त्यासाठी धरणे

मोहाडीत रस्त्यासाठी धरणे

Next
ठळक मुद्देबांधकाम निकृष्ट दर्जाचे । कारवाईकडे सर्वांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील मुंढरी बुज. ते करडी गावापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे करीत आहे.
निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झालेले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झालेले असल्याने रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. गावातील शेतकरी व या मार्गावरील पाच ते सहा गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. रस्त्याच्या अवस्थेमुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे.
सदर निकृष्ट कामाची चौकशी करून अंदाज पत्रकाप्रमाणे काम पूर्ण करण्यात यावे, सदर कामाचा निधी त्वरित मागविण्यात यावा व काम लवकर सुरु करावे या मागणीसाठी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीसमोर जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी मुंढरी खुर्दच्या सरपंच रेखा नेरकर, मुंढरी बुज. चे सरपंच एकनाथ चौरागडे, उपसरपंच जयपाल पडोळे, रविशंकर देशकर, रामाजी नेरकर, इत्यादी धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आंदोलन स्थळे माजी खासदार मधुकर कुकडे, के.बी. चौरागडे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. बांधकाम विभाग लक्ष देणार काय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Hold for road in Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.