शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रुग्णांचा उच्चांक, ७९३ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

शुक्रवारी ५६३७ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ३९२, मोहाडी ८९, तुमसर १३०, पवनी ...

शुक्रवारी ५६३७ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ३९२, मोहाडी ८९, तुमसर १३०, पवनी ९२, लाखनी ३७, साकोली ३४, लाखांदूर २९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ८९ हजार १३४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १९ हजार १७१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. त्यापैकी १५ हजार ६९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ३७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी भंडारा तालुक्यातील ५९ वर्षीय आणि तुमसर तालुक्यातील ८२ वर्षीय पुरुषासह पवनी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. दोन पुरुषांचा मृत्यू भंडाराच्या खासगी रुग्णालयात तर पवनी येथील महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

बॉक्स

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली

भंडारा जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० पर्यंत खाली आली होती. मात्र आता ही रुग्णसंख्या ३७५५ वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात १७५९, मोहाडी २८१, तुमसर ४९१, पवनी ५८०, लाखनी ३६२, साकोली १८२ आणि लाखांदूर तालुक्यातील शंभर रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह रुग्ण वाढत असून काही जणांवर रुग्णालयात तर काही व्यक्ती गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

बॉक्स

मांढळ येथे आढळले २७ रुग्ण

तुमसर : तालुक्यातील मांढळ येथे एकाच दिवशी २७ रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गावात अनोळखी व्यक्ती आणि चारचाकी वाहनाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. २७ जणांमध्ये तीन लहान मुले, एका शिक्षिकेचा समावेश आहे. गावच्या वेशीवर लाकडी कठडे लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.