लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी विभागात रिक्त पदाचा असलेला तिढा सुटलेला नाही. एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक पदाच्या पदभारामुळे अनेक कर्मचारी वर्गाचे आरोग्य बिघडले असून काही जणांचा अतिरिक्त ताणतणावाने आकस्मिक मृत्यू झाला आहे. अशा कुुंटुबांची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने त्या कुंटुबाला एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला.एकीकडे लोकप्रतिनिधींना पाच वर्षासाठी पेंशन योजना तात्काळ सुरु होते. परंतु ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे सेवा करूनही त्यांच्या कुटुंबियांना जुन्या पेंशन योजनेचा लाभ मियत नसल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, लहान लहान मुले, पत्नीवर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा जिल्हा कृषी विभागात कार्यरत विनोद गोपीचंद कापगते (४२) कनिष्ठ लिपीक लाखनी व धन्वंतरी हरिहर डोरले (३९) कृषी सहाय्यक साकोली या शासकीय कर्मचाºयांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी मुले असा परिवार आहे. घरातील कुटुंब प्रमुख अचानक मृत पावल्याने वृद्ध आईवडीलांसह, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जुन्या पेंशन हक्क संघटनेच्या वतीने ५२ हजार रुपयांची मदत दोन्ही कुटुंबियांना देऊन फुल ना फुलाच्या पाकळीने आधार देवून शासनाने मृत कर्मचाºयांच्या कुटुंबावर अन्याय केला असला तरी संघटनेच्या वतीने मदत देवून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेचे गोपाल मेश्राम यांनी सांगितले. कृषी क्षेत्रीय कर्मचारी पतसंस्था येथे संघटनेच्या पदाधिकाºयांसह मृता कापगते व डोरले कुटुंबियांना धनादेश देऊन मदत करण्यात आली. यावेळी टी.एस. शेंडे, गोपाल मेश्राम, धीरज हावरे, सुभाष भुरे, एस.एस. नागलवाडे, प्रेमदास खेकारे, भूपेश नवखरे, दीपक बावनकुळे, एकनाथ बावनकुळे, निर्मला भोंगाडे, केदार, मुळे एस हे उपस्थित होते. विनोद कापगते यांची नऊ वर्षांची सेवा तर धन्वंतरी डोरले यांची १० वर्षांची सेवा होऊनही त्यांच्या कुटुंबियांवर शासनाने त्यांच्यावर अन्याय केल्याने जुन्या पेंशनच्या लढ्यासाठी संघटना पुन्हा लढा देणार असल्याचे सांगितले.शासनाकडून कर्मचाऱ्यांवर अन्यायएका कृषी सहाय्यकाकडे १२ ते १४ गावे आहेत. अतिरिक्त प्रभार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे राज्यात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी शासनाने तात्काळ जुनी पेंशन योजना चालू करावी असे संघटनेच्या वतीने सांगितले.भंडारा येथील कर्मचाऱ्यांचा स्तुत्य उपक्रमशासनाकडून उपेक्षा झाल्याने भंडारा येथील जुन्या पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांसह, कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून मृत कुटुंबियांना धीर देत ५२ हजार प्रत्येकी एका कुटुंबियाला आर्थिक मदत दिली. त्यांना दिवाळी सणासाठी मदत केली असून भविष्यात मृत कुटुंबियांच्या पतसंस्थेतील कर्जाच्या रकमेतही सवलत देण्याचा मानस असल्याचे संघटनेचे पदाधिकारी गोपाल मेश्राम यांनी सांगितले.
मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:39 IST
कृषी विभागात रिक्त पदाचा असलेला तिढा सुटलेला नाही. एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक पदाच्या पदभारामुळे अनेक कर्मचारी वर्गाचे आरोग्य बिघडले असून काही जणांचा अतिरिक्त ताणतणावाने आकस्मिक मृत्यू झाला आहे.
मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाला मदतीचा हात
ठळक मुद्देएनपीएस धारक कर्मचाऱ्यांचा पुढाकार : अतिरिक्त ताणतणावाने होतोय आकस्मिक मृत्यू