जिल्ह्यात दमदार पावसाने भात पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:10+5:30

गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.

Heavy rains in the district saved the life of paddy crop | जिल्ह्यात दमदार पावसाने भात पिकाला जीवदान

जिल्ह्यात दमदार पावसाने भात पिकाला जीवदान

Next
ठळक मुद्देसरासरी ४३ मीमी पावसाची नोंद : भंडारा आणि साकोली तालुक्यात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने दडी मारल्याने धोक्यात आलेल्या भात पिकाला रविवारी झालेल्या दमदार पावसाने जीवदान मिळाले आहे. २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून भंडारा आणि साकोलीत अतिवृष्टी झाली. अवघ्या दोन तासात भंडारा शहरात १०४ मिमी पाऊस तर साकोलीत ७०.८ मिमी पाऊस कोसळला.
गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे  पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.
भंडारा तालुक्यात १०४ मिमी पाऊस अवघ्या दोन तासात कोसळला. तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी १२६०.८ असून १ जून ते ६ जुलैपर्यंत २७६.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी याच कालावधीत ३३२.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी या कालावधीत ४५०.८ मिमी म्हणजे १४३ टक्के पाऊस कोसळला. त्या खालोखाल साकोली तालुक्यात ७०.८ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ३१४.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. मोहाडी तालुक्यात गत २४ तासात २३ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २४८.७ मिमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के, तुमसर तालुक्यात २५.१ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २२३.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ८१ टक्के, पवनी तालुक्यात ५.४ टक्के पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३३३.९ मिमी, लाखांदूर तालुक्यात ३९.२ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २८६.८ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३९.८ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रोवणीचे काम करीत होते. परंतु पाऊस आल्याशिवाय रोवणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. धान उत्पादक शेतकºयांनी शेतात पऱ्ह्यांची नर्सरी टाकली होती. पऱ्हे रोवणीयोग्य झाले होते. परंतु पाऊस नसल्याने पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. अशा स्थितीत रविवारी झालेल्या पावसाने भात पिकाला जीवदान मिळाले आहे.
भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने शेतशिवारात रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतकरी आणि मजुरांनी शेतशिवार गजबजून गेले आहे.

प्रकल्पांमध्ये २७ टक्के जलसाठा
जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजरी तलावांमध्ये सध्या २७.८३ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ १०.४२ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर प्रकल्पात २०.१० टक्के, बघेडा प्रकल्पात ५५.६१ टक्के, बेटेकर बोदली प्रकल्पात २०.०७ टक्के पाणी साठा आहे. चार मध्यम प्रकल्पात ९.०६३ दलघमी जलसाठा असून तो २१.१६ टक्के आहे. जिल्ह्यातील ३१ लघुप्रकल्पात २९.५१ टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा तुमसर तालुक्यातील डोंगरला प्रकल्पात ७६.२६ टक्के आहे तर २८ माजी मालगुजारी तलावात सद्यस्थिती ३५.२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत तीन पट जलसाठा आहे. त्यामुळे सिंचणासाठी उपलब्ध होण्यास आगामी काळात अडचण जाणार नाही.

रविवारी झालेल्या दमदार पावसानंतर दुसऱ्या दिवशीही दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पाऊस कोसळला. या पावसाने रस्ते निर्मनुष्य झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. रविवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Web Title: Heavy rains in the district saved the life of paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती