राज्यमार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:41+5:30

दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असल्यावरही रस्त्याची वाईट अवस्था हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Hearth time for highway commuters | राज्यमार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ

राज्यमार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ

Next
ठळक मुद्देभंडारा-वरठी राज्य महामार्ग : खड्ड्यांची बेसुमार चाळण, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून नावारूपास असलेला भंडारा-वरठी राज्य महामार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असल्यावरही रस्त्याची वाईट अवस्था हा चिंतेचा विषय ठरत आहे. भंडारा - वरठी राज्य महामार्ग हा मृत्यूमार्ग ठरला असून अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
भंडारा - वरठी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्थानक असल्यामुळे दिवस रात्र प्रवाशांची रेलचेल सुरू राहते. भंडारा पासून वरठीपर्यंतचे दहा किमी अंतराच्या रस्त्यावर अनेक भागातील रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. दर दोन फुटावर पडलेले खड्डे मोजण्यापलीकडे असून पावसाचे पाणी त्यात साचल्याने प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे अपघातांना कारणीभूत असून विद्यार्थी व नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहेत. अनेक भागातील रस्ता खोदकामामुळे अनेक ठिकाणी त्याचे निशाण आहेत. योग्य प्रमाणात डागडुगी न झाल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
जगनाडे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व डॉ. आंबेडकर चौक ते बसस्थानक आणि जुना तुमसर बायपास रस्त्याची हालत एकदम खस्ता झाली आहे.
सदर रस्ता पूर्णत: उखडला आहे. रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तलाव जवळील रस्ता व बसस्थानक मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचल्याने रस्ता आहे की खड्डा हे दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना कमालीचा फटका बसतो. रस्ता रहदारीचा असल्यामुळे दिवस रात्र रस्त्यावरून वाहन व पादचाऱ्यांची रेलचेल राहते. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात पाणी साचून असल्याने पादचारी व दुचाकीस्वारांना कमालीचा फटका बसतो. खड्ड्यातील पाणी उडाल्याने अनेकांना आपले काम सोडून घरी परतावे लागत असून अनेकांना खड्ड्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
दाभा ते मेहंदी पूल रस्ता ओलांडणे म्हंणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्यावरून भरधाव धावणारे रेती वाहून नेणारे वाहने आणि रस्त्याची अवस्था वाईट असल्याने हमखास अपघात होताना दिसतात. मेहंदी पुलापासून ते दाभा वळण रस्त्यापर्यंत एकदम खराब रस्ता आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे रस्त्याच्या अनेक भागातील डांबर उखडले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुगी करण्यात आली होती. अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याच्या कामामातील गैरप्रकार उजेडास आला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ऑटोरिक्षा चालकांना फटका
भंडारा - वरठी महार्गावर सर्वाधिक प्रवाशी ऑटोरिक्षा धावतात. रस्त्याच्या वाईट अवस्थेचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. रस्त्याची वाईट अवस्था व रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे त्रासदायक ठरत आहे. प्रवाशांचे वेळापत्रक सांभाळताना रस्त्यावरून धावणाऱ्या ऑटोरिक्षा चालक कमालीचे संतापले आहेत. इतर वाहनांच्या तुलनेत त्यांच्या वाहनांची होणारी तुटफूट व नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. इतर प्रवाशी वाहनांच्या तुलनेत असलेले लहान आकार व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे त्यांना अकारण त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ऑटो रिक्षाच्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोहचत आहे.

Web Title: Hearth time for highway commuters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.