शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांकडून खाते उघडण्यासाठी घेत होता कमिशन; एजन्टला देण्यासाठी पैसे नसल्याने स्वतःच्याच लुटीचा केला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:50 IST

खोटी तक्रार पडली महागात, फिर्यादीवरच गुन्हा दाखल : ३ दिवसानंतर हरिदासने पोलिसांत विचाराअंती नोंदविली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) :
आपल्याला रस्त्यात लुटून ७३ हजार रुपयांची रक्कम पळविली, अशी तक्रार देणाऱ्या फिर्यादीचा खोटारडेपणा चौकशीनंतर स्पष्ट झाला. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या फिर्यादीवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हरिदास सखाराम पडोळे, असे या व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकरण असे, २० सप्टेंबरला हरिदास सखाराम पडोळे (६५, मांडवी ता. भंडारा) यांनी पोलिस स्टेशन करडी येथे तक्रार दिली. १७ सप्टेंबरला दुचाकीने (एमएच ३६ / ई ५४८०) सकाळी ७:४० वाजता मांडवी येथून दुधारा येथे जात असताना ढिवरवाडा जंगल परिसरात पाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी काठी फेकून दुचाकीवरून खाली पाडले व बळजबरीने पॅन्टच्या खिशातून रोख ७३ हजार रुपयांची रक्कम काढून जंगलात पळून गेले, अशी तक्रार त्याने पोलिसांत दिली. या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहून करडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३(५) नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

या गुन्ह्याचा तपास ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांनी स्वतः केला. घटनास्थळी श्वानपथकाला नेऊन तपास घेतला. एवढेच नाही तर, तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली. मात्र, शंका बळावल्याने महत्त्वाच्या साक्षीदारांना विचारपूस करून सखोल तपास केला असता वेगळाच प्रकार पुढे आला. खुद्द फिर्यादीची तक्रारच खोटी आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याने ठाणेदार नागलोत यांनी हरिदासविरुद्ध कलम २१७ नुसार गुन्हा दाखल केला.

असा रचला बनाव

हरिदास हा निराधार योजनेचे पात्र असलेल्या लोकांकडून कागदपत्रे घेऊन कमिशनवर त्यांचे खाते उघडण्यासाठी दुसऱ्या एजंटकडे पाठवीत होता. या कामासाठी प्रत्येक व्यक्तीकडून स्वतःसाठी ५०० रुपयांचे कमिशन घेऊन उर्वरित रक्कम समोरील एजंटला देत होता. त्याच्याकडे मांडवी येथील निराधार योजनेस पात्र लाभार्थ्यांकडून कमिशन म्हणून घेतलेले ६३ हजार रुपये जमा झाले होते. त्यातील ५९ हजार ५०० रुपये एजंटला द्यायचे होते; परंतु घटनेच्या तीन दिवसांपूर्वी त्याच्याकडील ७३ हजार रुपयांची रक्कम कुठेतरी पडून गहाळ झाली. एजंटला देण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्याने अशी कपोलकल्पीत घटना डोक्यात आखली आणि पोलिसांत खोटी तक्रारही नोंदविली. यातून त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच त्यात फसला.


"नागरिकांनी खरी आणि वस्तूनिष्ठ माहिती द्यावी. स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, आणि तपास भरकटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करु नये."
- गोरक्षनाथ नागलोत, ठाणेदार, करडी

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी