शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
2
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
3
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
4
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
5
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
6
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
7
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
8
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
9
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
10
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
11
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
12
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
13
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
14
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
15
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
16
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
17
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
18
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
19
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
20
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...

जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार चर्चा आहे. तर अन्य वन्यप्राण्यांनीदेखील उन्हाळ्यापूर्वीच गावाकडे कूच केल्याचे सांगितले जात आहे. 

ठळक मुद्दे शेतपिकाचे अतोनात नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांच्या एका कळपाने हैदोस घातल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती लाखांदूर येथील वनपरिक्षेत्र विभागाला होताच या रानगव्यांना हाकलून लावण्यात संबंधित विभागाच्या अधिकारी,  कर्मचाऱ्यांना यश आले आहे.    माहितीनुसार, गत दोन दिवसापूर्वी तालुक्यातील दिघोरी/मोठी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शेतशिवारात जवळपास २० ते २५  रानगव्यांनी शिरकाव केला.सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार चर्चा आहे. तर अन्य वन्यप्राण्यांनीदेखील उन्हाळ्यापूर्वीच गावाकडे कूच केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, दोन दिवसापूर्वी रानगव्यांनी शेतशिवारात धुडगूस घातल्याने दहेगाव येथील तिकाराम डोंगरवार नामक शेतकऱ्यासह अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बोंब सुरू आहे. सदर घटनेची माहिती पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील वनविभागाला दिली असता येथील वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्रसहायक जे. के. दिघोरे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक एस. जी. खंडागळेसह काही वनमजूर व गावकऱ्यांनी जंगल परिसरात जाऊन रानगव्यांना हाकलून लावल्याची माहिती देण्यात आली आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतपिकाचे पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली असल्याची माहिती देण्यात  आली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव