शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी, विद्यार्थ्यांना माराल तर खबरदार!

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असे म्हणण्याचा काळ केव्हाच संपला आहे. आता विद्यार्थ्यांना साधा फटका मारण्याची किंवा दाटण्याची सोय राहणार नाही, तसे धाडस गुरुजींनी केलेच तर त्यांना सहा

नवा बालहक्क कायदा : दंडात्मक कारवाई, तुरुंगवास, प्रसंगी बडतर्फीही होऊ शकते
सुधन्वा चेटुले - खराशी
छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असे म्हणण्याचा काळ केव्हाच संपला आहे. आता विद्यार्थ्यांना साधा फटका मारण्याची किंवा दाटण्याची सोय राहणार नाही, तसे धाडस गुरुजींनी केलेच तर त्यांना सहा महिने ते तीन वर्षापर्यंत तुरुंग, एक लाख रुपये दंड आणि नोकरीतून थेट बडतर्फ व्हावे लागेल. नव्या बालहक्क कायद्यात तसे बदल होऊ घातले आहेत.
केंद्र सरकारने सन २००० मध्ये सुधारित बाल हक्क कायदा मंजूर केला. २००८ आणि २०११ मध्ये त्यात दुरुस्ती करण्यात आली. पुढे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण आणि मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला चाप लावण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने आपला अहवाल २०१३ मध्ये केंद्र सरकारला सादर केला होता.
मुलांचा छळ करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस त्यात करण्यात आली होती. त्या आधारे केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने तयार केलेला बाल हक्क कायदा २०१४ चा मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात शिक्षकांवरील कठोर कारवाईच्या कलमाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गुरुजींनी सावधान होण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांना होणारी मारहाण किंवा मानसिक धक्का बसेल, अशी वर्तणूक शिक्षक किंवा शाळेतील कर्मचाऱ्याने केली तर त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या ३२० कलमान्वये दुखापत किंवा गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल होणार आहे. या कारवाईसाठी राज्य सरकारला उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणाऱ्या शिक्षकाला पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. गुन्हा वारंवार घडत असल्यास शिक्षेतही वाढ करण्याची तरतूद या कायद्यात आहे.
विशेष म्हणजे याआधी विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्याचे प्रकार शिक्षकांच्या हातून घडले आहेत.
तसेच पालकांच्या तक्रारींचा धसका घेत अनेक शाळांतील गुरुजींच्या हातात असणारी छडी हद्दपार झाली आहे. त्यामुळे शिक्षकांनाही कायद्याची घडी लागल्याचे बोलले जात आहे.