शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गळती थांबविण्यासाठी ‘गट पासिंग’ योजना

By admin | Updated: May 30, 2016 00:55 IST

इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे.

 इयत्ता नववीच्या परीक्षा ७५० गुणांची : शिक्षण विभागाचा निर्णयशिवशंकर बावनकुळेसाकोलीइयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. बहुतांशी शाळांमध्ये दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी नववीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. यामूळे शासनाने इयत्ता नववीची विशेषत: मुलींचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्यासाठी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुधारित धोरणांची अंमलबजावणी केली आहे.इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर ३० दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करवून घेऊन १० जुलैपर्यंत परीक्षा घेऊन २१ जुलैला उत्तीर्णचा निकाल लावण्यात येणार आहे. यात किमान अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत प्रवेश द्यावा. तसेच २० जुलैपूर्वी पालकांची मागणी असली तरी टीसी देऊ नये, १०० टक्के निकाल असणाऱ्या निवडक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची टिमकडून निकाल कमी असणाऱ्या शाळांना उद्बोधन केले जाणार आहे. कमी निकालाच्या शाळांचा अहवाल शिक्षणाधिकारी उपसंचालकांना कळविणार आहेत. इयत्ता नववीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा प्रत्येकी १०० गुण विज्ञान व तंत्रज्ञान १००, गणित १०० गुण, समाजशास्त्र १०० गुण, आयसीटी ५० गुण, व्यक्तिमत्व विकास ५० गुण, शारीरिक शिक्षण ५० गुण अशी ७५० गुणांची प्रथमसत्र व द्वितीय सत्र अशा दोन परिक्षा होतील. प्रत्येक विषयात ३५टक्के उत्तीर्णसाठा आवश्यक आहे. परंतु अनुत्तीर्ण झाल्यास गटपासिंग राहील यात तीन भाषा विषयांच्या गुणांची बेरीज १०५ असावी एका विषयात किमान २५ पेक्षा कमी कुण नको. गणित व विज्ञान विषयाचागट करावा या दोन विषयाची बेरीज ७० असावी पंरतु प्रत्येक विषयात २५ पेक्षा कमी गुण नसावे असे करुनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ग्रेस गुण एकूण २० द्यावे, ग्रेस गुण एकूण बेरजेत घ्यावे. गेस लावलेल्या विद्यार्थ्याला सपास असा शेरा द्यावा. एवढे करुनी मुलगा नापास करावे. निकाल ३० एप्रिलला असणार आहे. शाळेचा शेवटचा दिवस १ मे व शाळा सुरु होण्याचा दिनांक १५ जून राहणार आहे. एखाद्या विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गैरहजर असेल तर त्याच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे. त्याने दिलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांना दोननेच गुणायचे आहे. त्याची पुन्हा परीक्षा घेऊ नये. अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व विषयाची क्षमता मुलापर्यंत प्राप्त होईपर्यंत त्यांना ज्ञानार्जन करणे काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहींना उशिरा कळते. क्षमता प्राप्त होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. शिक्षकाना यामुळे त्रास होण्यास कारण नाही. - सुभाष बावनकुळे,प्र. गट शिक्षणाधिकारी साकोली